Viral video: सोशल मीडियावर एक अतिशय धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. शिकारी पक्षातील सर्वच पक्ष्यांची दृष्टी अतिशय तीक्ष्ण असून गरूड हा पक्ष्यांचा राजा एक ते दीड मैलावरची शिकार पाहू शकतो. सर्व पक्ष्यांमध्ये गरुड हा सर्वात धोकादायक आणि शक्तिशाली शिकारी आहे. असं म्हणतात की, त्याच्या पंखात एवढी शक्ती असते की तो सर्वात मोठी शिकारही सहज उचलू शकतो आणि आकाशात उडू शकतो. गरुड त्याच्या मजबूत पंखांच्या जोरावर कोणत्याही आणि मोठ्या प्राण्याची सहज शिकार करु शकतो. मात्र यावेळी गरुडाने चक्क मगरीशी पंगा घेतला आहे.
‘शिकार करो या शिकार बनो’
‘शिकार करो या शिकार बनो’ हा जंगलात जगण्याचा नियम आहे. जर तुम्हाला शिकार करता येत नसेल, तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी; अन्यथा तुमची काही खैर नाही. जंगलात कोणीही सुरक्षित नसतं. सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. हे व्हिडीओ कधी थरारक असतात; तर काही व्हिडीओ मजेदार असतात. त्यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे.
हरलेला डाव कसा जिंकला पाहा
सोशल मीडियावर एक आश्चर्यकारक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक गरुड मगरीपासून तिची शिकार घेऊन पळत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. मगरीला पाहून गरुड पंख फडफडवत उडण्याचा प्रयत्न करतो, पण मगर आपली शिकार हातातून गेल्याच्या रागातून असा कमबॅक करते की गरुडाला पळ काढावा लागला. अशा स्थितीत आपला जीव वाचवण्यासाठी गरुड शिकारीला नदीकाठी सोडून पळून जातो, तर मगर शिकार पकडून त्याला खाऊ लागते.सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामुळे कोणालाच कमी समजू नका, कधी डाव उलटेल हे सांगू शकत नाही.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: खरा पुणेकर! ओळखीनं दर्शन घेणाऱ्या भक्तांना पुणेरी शैलीत उत्तर; दगडूशेठ मंदिराबाहेरची पुणेरी पाटी एकदा पाहाच
हा व्हिडिओ सोशल मीडियावर @Latestsightings नावाच्या युट्यूब चॅनेलवर शेअर करण्यात आला आहे. त्यासोबत कॅप्शन आहे, गरुडाने मगरीकडून शिकार पळवली पण मगरीने ती परत मिळवली. या व्हिडिओला शेअर केल्यापासून ३३ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. यावर युजर्स कमेंटही करत आहेत, एका यूजरने लिहिले… “एखाद्याने शत्रूला कधीही हलके समजू नये.” दुसऱ्या युजरने लिहिले…”गरीब गरुड, आज त्याचे नशीब चांगले नव्हते. तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले… गरुडाची ताकद माहिती असताना मगरीने हिम्मत दाखवली.”