Viral Video: नुकताच काही दिवसांपूर्वी दिवाळीचा सण पार पडला. भारतात हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. सध्या दिवाळीच्या दिवसांतील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतायत, ज्यात काही सुंदर व्हिडीओ पाहायला मिळत आहेत; तर काही व्हिडीओंमध्ये जीवघेणे स्टंट्स पाहायला मिळत आहेत. अशा घटनांमुळे अनेकदा दुखापतही होते; परंतु तरीही लोक असे स्टंट करताना दिसतात. आता व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्येही असंच काहीतरी पाहायला मिळत आहे, जे पाहून तुम्ही कपाळावर हात मारून घ्याल.
लहान मुलं खूप निरागस असतात; पण ती कधी काय करामत करतील ते कोणीही सांगू शकत नाही. आपण काय करतोय आणि तसे केल्यानंतर पुढे काय होईल? याची कल्पना त्यांना नसते. त्यामुळेच अनेकदा आई-वडिलांच्या नकळत ते अशा काही गोष्टी करतात, ज्यामुळे संपूर्ण कुटुंब त्रस्त होते. सध्या अशाच प्रकारचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात काही लहान मुलं मिळून फटाके फोडताना दिसत आहेत. पण यावेळी ती असं काहीतरी करतात, जे पाहून नेटकरीही अवाक् झाले आहेत.
काय घडलं व्हिडीओमध्ये?
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, घराबाहेरच्या परिसरात काही लहान मुलं मिळून फटाके फोडत आहेत. यावेळी त्यातील एक मुलगा स्वतःच्या तोंडात फटाका ठेवतो आणि दुसरा मुलगा तो फटाका पेटवतो. फटाका पेटवल्यानंतर आसपासची मुलं पळून जातात. तेवढ्यात फटाका चिमुकल्याच्या तोंडावर फुटतो. फटाका फुटल्यामुळे चिमुकल्याला चटका बसतो. हा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी संताप व्यक्त करताना दिसत आहेत.
हेही वाचा: “अशी मैत्री कधी पाहिली नसेल…” बिबट्या आणि हरणाची अनोखी मैत्री; VIDEO पाहून व्हाल थक्क
पाहा व्हिडीओ:
हा व्हायरल व्हिडीओ ट्विटरवरील @solapuri_laibhari या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे आणि त्यावर आतापर्यंत जवळपास एक लाखाहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स आल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यातील एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “निव्वळ निर्लज्जपणा आहे.” तर दुसऱ्या युजरने लिहिलेय, “अरे अजून कशाला व्हायरल करताय… अजून लहान मुलांनी हे करायला पाहिजे का?” तिसऱ्याने लिहिलेय, “हा उद्योग दिसेल; पण नंतर फुटलेला जबडापण दाखवायला हवा. म्हणजे हे बघून दुसरी लहान मुलं तसं करणार नाहीत.” तर आणखी अनेक युजर्स व्हिडीओवर संताप व्यक्त करताना दिसत आहेत.