Viral Video: सोशल मीडियावर अनेक चांगल्या-वाईट घटनांचे व्हिडीओ आपल्या नजरेस पडतात. हल्ली अनेक युजर्स सोशल मीडियावर उत्तम दर्जाचे कंटेंट शेअर करतात; ज्यात सुंदर डान्स, संगीत, रेसिपी, लेखन अशा विविध गोष्टी आपल्याला पाहायला किंवा वाचायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीही कौतुक कराल.
काही महिन्यांपासून सोशल मीडियावर ‘गुलाबी साडी’, ‘सुसेकी’, ‘तौबा तौबा’ अशी अनेक भारतीय गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. या गाण्यांवर अनेकांनी रील्स बनवल्या असून, सोशल मीडियावर अनेकांना या गाण्यांचे वेड लागले आहे. तसेच अनेकदा सोशल मीडियावर काही जुनी गाणीदेखील खूप चर्चेत येतात. दरम्यान, सध्या ‘उई अम्मा’ हे गाणं खूप चर्चेत आहे, ज्यावर सोशल मीडियावरील अनेक जण रील्स बनविताना दिसत आहेत.
पूर्वी फक्त स्त्रियाच लावणी नृत्य आणि आयटम साँगवर नाचताना दिसायच्या; परंतु आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओंमध्ये अनेक पुरुष मंडळीही या गाण्यांवर आवडीने नाचताना करतात. इतकेच काय, तर कधी कधी त्यांचा डान्स महिला कलाकारांपेक्षा अधिक आकर्षक आणि सुंदर असतो. आताही असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक चिमुकला आयटम साँगवर नाचताना दिसतोय.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चिमुकला ‘उई अम्मा’ या गाण्यावर डान्स करताना दिसतोय. यावेळी तो त्या गाण्यातील स्टेप्स अगदी हुबेहूब करतो. त्याशिवाय यावेळी त्याच्या चेहऱ्यावरचे एक्स्प्रेशन्सही पाहण्यासारखे आहेत. त्याचा हा डान्स सध्या खूप व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @vidhit.rawat या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत जवळपास पाच लाखांहून अधिक व्ह्युज आणि २५ हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.
या व्हिडीओवर अनेक एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “खूप भारी नाचला”. दुसऱ्या युजरने लिहिलेय, “कमाल केलीस तू तर”. तर तिसऱ्याने लिहिलेय, “आईशप्पथ खरंच कमाल डान्स”. तर आणखी अनेक युजर्स चिमुकल्याचे कौतुक करताना दिसत आहेत.