Viral Video: येत्या काही दिवसांमध्ये दिवाळीला सुरुवात होईल. भारतात हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. लहान मुलंदेखील या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. या दिवशी देवी लक्ष्मीच्या पूजेबरोबरच नवीन कपडे, मिठाई, फटाके वाजवले जातात. खरं तर फटाक्यांमुळे वायू आणि ध्वनी प्रदूषण होते, पण तरीही अनेक जण आनंद साजरा करण्यासाठी फटाके वाजवतातच. शिवाय फटाके वाजवताना जीवघेणे स्टंटदेखील करतात, ज्यात बऱ्याचदा काहींना गंभीर दुखापत होते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय, ज्यात एक लहान मुलगा फटाके वाजवताना असं काहीतरी करतो, जे पाहून नेटकरीही संताप व्यक्त करताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर हल्ली अनेक व्हिडीओ व्हायरल झालेले पाहायला मिळतात. ज्यामध्ये विविध विषयांवरील रील्स, व्हिडीओ आपण पाहतो. अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक वयोगटातील व्यक्तीचा यात समावेश असतो. रील्स बनवण्याचा ट्रेंड सुरू झाल्यापासून लोक जास्त व्ह्यूज अन् लाइक्स मिळाव्या यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता जीव धोक्यात घालतात. सध्या एका लहान मुलाचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका मार्केटमध्ये काही मुलं फटाके वाजवत आहेत. यावेळी गंमत म्हणून ते एका बादलीखाली फटाका लावून त्यातील एक मुलगा त्या बादलीवर बसतो. फटाका फुटताच बादलीवर बसलेल्या मुलाला जोरात चटका बसतो आणि तो उभा राहून मोठमोठ्याने कळवतो. शेवटी तो जमिनीवर लोळून रडू लागतो. फटाक्याबरोबर केलेली मस्ती मुलाच्या चांगलीच अंगलट आल्याचे दिसत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हायरल व्हिडीओ ट्विटरवरील @ViralConte97098 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत जवळपास दोन मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यातील एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “नाद केला अंगलट आला”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “निव्वळ मूर्खपणा आहे.” तर तिसऱ्याने लिहिलंय की, “काय गरज होती, असं करायची”, तर आणखी अनेक युजर्स व्हिडीओवर संताप व्यक्त करताना दिसत आहेत.