Viral Video: समाजमाध्यमांवर सतत विविध विषयांवर आधारित व्हिडीओ आपण पाहतो. त्यात अनेकदा आपल्या काळजाचा ठोका चुकविणारे स्टंटचे व्हिडीओ पाहायला मिळतात. हल्ली सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळविण्यासाठी अनेक जण विविध प्रकारचे स्टंट करतात. अनेकदा बाईक किंवा इतर कोणतेही वाहन चालवताना, तर कधी प्राण्यांबरोबर मस्ती करताना अनेक जण आपल्या जीवाची बाजी लावताना दिसतात. पण, आता व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये एक चिमुकला प्राण्यांबरोबर मस्ती करताना दिसतोय. पण, पुढे असं काही होतं जे पाहून तुमचा थरकाप उडेल.
बालपणीचे दिवस हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील अनमोल क्षण असतात. या दिवसांमध्ये मुले खेळतात, बागडतात. एकंदरीत आयुष्यातील सर्वांत सुंदर काळ मुले जगतात. सोशल मीडियावरही लहान मुलांचे अनेक सुंदर व्हिडीओ व्हायरल होत असतात; ज्यात काही मुलं कधी एखादं गाणं गाताना, डान्स करताना किंवा एखादी कला सादर करताना दिसतात. पण, आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा पाळीव प्राण्यांबरोबर मस्ती करताना दिसतोय.
या व्हायरल व्हिडीओच्या सुरुवातीला तुम्ही पाहू शकता, एक लहान मुलगा रानडुक्कराच्या पाठीवर बसतो आणि पुढे जाऊन जोरात आपटतो. त्यानंतर पुढच्या क्लिपमध्ये तो गाय, म्हैस, मेंढी या सर्व प्राण्यांच्या अंगावर उड्या मारून बसतो. चिमुकल्याचा हा अतरंगीपणा पाहून अनेक जण विविध कमेंट्स करताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ ट्विटरवरील @ViralConte97098 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून अनेक व्ह्युज आणि लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.
युजर्सच्या कमेंट्स चर्चेत
या व्हिडीओवर कमेंट्स करीत एका युजरनं लिहिलंय, “कोणाचा पोरगा आहे रे हा?” दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “वेडा दिसतोय जरा”, आणखी एकानं लिहिलंय, “आई-बाबांचा रोज मार खात असेल.”