Viral Video: ज्याप्रमाणे बाप आणि लेकीचे नाते खूप खास मानले जाते. त्याचप्रमाणे आई आणि मुलगा यांच्यातील बॉण्डिंगही खूप खास असते. आई तिच्या मुलांना फक्त संस्कारच नाही, तर अनेक नवनवीन गोष्टी करण्यास प्रोत्साहनही देते. आजपर्यंत आई आणि मुलांचे अनेक सुंदर व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहिले असतील. आताही असाच एक व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे.
आजकालच्या लहान मुलांमध्ये सोशल मीडियाप्रति खूप आकर्षण आहे. नवनवीन जुनी गाणी, चित्रपट आणि त्यातील डायलॉग्ज मुलांना तोंडपाठ असतात. हल्लीची ही मुलं सोशल मीडियावरील बदलत्या ट्रेंडनुसार वागताना, बोलताना दिसतात. सोशल मीडियाप्रति मुलांमध्ये खूप उत्सुकता आणि आकर्षण आहे. मोठ्यांप्रमाणेच लहान मुलंदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली कला सादर करताना दिसतात. आतापर्यंत आपण अनेक व्हायरल व्हिडीओ पाहिले आहेत. दरम्यान, आता अशाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ खूप चर्चेत आलाय, जो पाहून तुम्हीही कौतुक कराल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चिमुकला त्याच्या घरामध्ये ‘नीचे फूलों की दुकान’ या जुन्या बॉलीवूड गाण्यावर गोविंदा स्टाईलमध्ये डान्स करताना दिसतोय. यावेळी त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि डान्स स्टेप्स तुम्हीही टक लावून पाहत राहाल. या व्हिडीओमध्ये त्याची आईदेखील त्याच्याबरोबर नाचायला सुरुवात करते. त्या दोघांचा हा डान्स खूप व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @k_black__editor या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत जवळपास लाखो व्ह्युज आणि लाइक्स आल्या आहेत. त्याशिवाय यावर अनेक युजर्सही कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “सेम टू सेम गोविंदा”. दुसऱ्या युजरने लिहिलेय, “चिमुकल्यांचे एक्स्प्रेशन्स कमाल आहेत”. तिसऱ्या व्यक्तीने लिहिलेय, “खूप सुंदर, मस्तच”. आणखी एकाने लिहिलेय, “ताई, तुमचा पोरगा खूप भारी नाचतोय”.