Viral Video: या जगात जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य सारखं नसतं. काही जण संपूर्ण आयुष्य श्रीमंतीत जगतात, तर काहींना दोन वेळचे अन्न मिळणंही कठीण असतं. समाजमाध्यमांवर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यातील काही व्हिडीओतील घटना आपल्या मनाला स्पर्शून जातात. असे व्हिडीओ सोशल मीडियावर क्षणार्धात लाखो व्ह्यूज आणि लाइक्सही मिळवतात. सध्या असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, जो पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बालपणीचे दिवस हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील अनमोल क्षण असतात. या दिवसांमध्ये मुलं खेळतात, बागडतात आयुष्यातील सर्वात सुंदर काळ जगतात. सोशल मीडियावरही लहान मुलांचे अनेक सुंदर व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यात काही मुलं कधी एखादं गाणं गाताना, डान्स करताना किंवा एखादी कला सादर करताना दिसतात. पण, आता सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये परिस्थितीने गरीब असलेला एक लहान मुलगा त्याचं दुकान वाचवताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरीही भावूक झाले आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्याच्या शेजारी बांधलेल्या दुकानातील सामान वादळ आल्यामुळे उडू लागते. यावेळी दुकानावरील ताडपत्री उडून जाऊ नये म्हणून एक चिमुकला त्याच्या हातांनी ताडपत्री पकडतो. त्यानंतर त्याच्या दुकानातील खुर्ची उडून जाते म्हणून तो पळत जातो आणि दूरवर गेलेली खुर्ची पुन्हा घेऊन येतो. या चिमुकल्याचे हे प्रयत्न पाहून अनेक जण भावूक झाले आहेत.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @balumama__bhakt_official या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत एक मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून यावर एक लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा: ‘यांना देव तरी माफ करेल का?’, स्वतःच्या स्वार्थासाठी गाढवाबरोबर केलं असं काही की… VIDEO पाहून नेटकरी हळहळले

पाहा व्हिडीओ:

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “माणूस म्हणून जगताना.. माणुसकी हीच आपली ओळख असली पाहिजे”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, परिस्थिती माणसाला सर्व काही शिकवते; आमचंसुद्धा लहानपण असंच होतं.” तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “प्रत्येक दिवस सारखे नसतात”, तर चौथ्या युजरने लिहिलंय की, “आयुष्यातला अविस्मरणीय क्षण..!!”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video small boy struggle to save the shop users also got emotional after seeing the video sap