Viral Video: सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असून, सोशल मीडियावर लग्नातील हटके रील्स, व्हिडीओ आणि फोटो सतत व्हायरल होत असतात. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये लग्नातील अनेक गमती-जमती, अनोख्या प्रथा, हटके उखाणे आपल्याला पाहायला मिळतात. पण, कधी कधी लग्नातील वधू-वराच्या मित्र-मैत्रिणी त्यांच्याबरोबर असं काहीतरी करतात, जे पाहून कोणाच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय, ज्यावर नेटकरी संताप व्यक्त करताना दिसत आहेत.
मस्करी, मजा, मस्ती या गोष्टी काही क्षणापर्यंत आणि निवडक ठिकाणीच केल्यावर योग्य मानल्या जातात. पण, अनेकदा काही लोक उत्साहाच्या भरात चारचौघांतच असं काहीतरी करतात, ज्यामुळे ती मस्करी त्यांच्यावर भारी पडते. या व्हिडीओतही असंच काहीतरी पाहायला मिळत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्नमंडपामध्ये वधू तिच्या मैत्रिणींबरोबर उभी असून, तिथे एक लहान मुलगा येतो आणि सरळ वधूच्या उघड्या पोटावर जोरात फडका मारतो. हे पाहून वधू चिडते आणि त्याच्या जोरात कानाखाली मारते. वधूने मारलेल्या एका चापटीत तो खाली पडतो. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @_remix_rocky या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत तीन दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्सही कमेंट्स करीत आहेत.
पाहा व्हिडीओ:
एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “मुलावर अजिबात संस्कार नाही. दुसऱ्या युजरने लिहिलेय, “तिने जे केलं ते योग्य आहे”. आणखी एकाने लिहिलेय, “मूर्ख लोक आहेत”. आणखी एकाने लिहिलेय, “काय, नालायक मुलगा आहे”.