Viral Video: मांजर आणि कुत्रा हे अनेकांचे आवडते प्राणी आहेत. त्यांच्या या पाळीव प्राण्यांवर लोकांचे जीवापाड प्रेम असते. या पाळीव प्राण्यांना अनेकदा घरातील इतर सदस्यांपेक्षाही उत्तम वागणूक दिली जाते. त्यांची आवड-निवड पूर्ण केली जाते. हल्ली या दोन्ही प्राण्यांचे वाढदिवसदेखील आवडीने साजरे केले जातात, अशा अनेक कौतुक सोहळ्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात; शिवाय या लाडक्या प्राण्यांचे त्यांच्या घरातील अनेक मजेशीर व्हिडीओदेखील समाजमाध्यमांवर खूप व्हायरल होत असतात. परंतु आता असा एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात एक लहान मुलगा मांजरीला मारण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे पण अचानक असं काहीतरी होतं जे पाहून युजर्सही समाधान व्यक्त करताना दिसत आहेत.
जगात जसे प्राणी प्रेमी असतात तसे अनेकजण प्राण्यांचा तिरस्कारही करताना दिसतात. प्राण्यांना मारहाण करणारे, प्राण्यांवर अत्याचार करणाऱ्या लोकांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. लहान मुलं आणि प्राण्यांची देखील खूप चांगली मैत्री असते पण काही खोडकर मुलं विणाकारण प्राण्यांना त्रास देताना दिसतात. या व्हिडीओमध्ये देखील असंच काहीतरी पाहायला मिळत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक लहान मुलगा पळत पळत त्याच्या घरामध्ये येतो. त्यावेळी मांजरीचे एक लहान पिल्लू देखील त्याच्या मागोमाग येते. पिल्लाला पाहून तो लहान मुलगा त्याला जोरात लाथ मारण्यासाठी पुढे येतो पण इतक्याच मांजरीचे पिल्लू सावध होऊन तिथून पळ काढते, तोवर त्या लहान मुलाचा अंदाज चुकतो आणि तो जोरात जमिनीवर कोसळतो. यावेळी त्याच्या गुडघ्याला लागते आणि तो रडू लागतो. त्या मुलाला पडलेलं पाहून शेजारी बसलेले त्याचे वडिल धावत येऊन त्याला उठवतात. हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ @babicuttie या अकाउन्टवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत जवळपास दीड लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत तसेच अनेक लाइक्सही मिळाल्या आहेत. यावर नेटकरी देखील अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत. ज्यात एका युजरने लिहिलंय की, “कर्माचे फळ लगेच मिळते”. तर दुसऱ्याने लिहिलंय की, “याला असंच पाहिजे”, तर तिसऱ्या एकाने लिहिलंय की, “मांजरीला त्रास देऊ नये बाळा, नाहीतर असंच होणार”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “कर्म परत येते”
दरम्यान, यापूर्वी देखील असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते ज्यात काही लोक प्राण्यांना त्रास देताना दिसले होते. या व्हिडीओंवर युजर्सकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता.