Viral Video: समाजमाध्यमांवर सतत विविध व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात, ज्यात कधी धडकी भरवणारे व्हिडीओ पाहायला मिळतात, तर कधी आपल्या चेहऱ्यावर हसू आणणारे व्हिडीओ पाहायला मिळतात. तसेच बऱ्याचदा यावर असे काही व्हिडीओ व्हायरल होतात, ज्यात नकळत घडलेल्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. सध्या अशाच दोन लहान चिमुकल्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय, ज्यात घटना पाहून काळजाचा ठोका चुकेल.

लहान मुलं जेवढी निरागस असतात तितकीच ती खोडकरही असतात, त्यामुळे ते नकळत कधी काय करतील याचा अंदाज लावणं खूप कठीण आहे. त्यांना आपण काय करतोय आणि हे केल्यानंतर पुढे काय होईल याची कल्पना नसते, त्यामुळेच बऱ्याचदा आई-वडिलांच्या नकळत ते अशा काही गोष्टी करतात, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाला त्याचा त्रास सहन करावा लागतो. ज्यात कधी नकळत तोंडात पैसे घालणे, तर कधी खाण्यायोग्य नसलेल्या गोष्टी आई-वडिलांच्या नकळत खाणे, खेळत खेळत दुर्घटना होईल अशा ठिकाणी जाणे; अशा घटनांमध्ये अनेकदा चिमुकल्यांना आपला जीवदेखील गमवावा लागतो. सध्या अशाच प्रकारचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, जो पाहून काही क्षण तुमचाही थरकाप उडेल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन लहान मुलं एका मोठ्या गेटजवळ उभे असून यावेळी ते गेटबरोबर खेळताना दिसत आहेत. त्यावेळी एकजण गेटचा एक दरवाजा पूर्ण उघडतो, तर दुसरा चिमुकला गेटचा दुसरा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो. परंतु, यावेळी ते गेट त्याच्या अंगावर पडते. यावेळी पहिला चिकमुला त्याला गेट खालून बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न करतो आणि त्याला सुखरूप बाहेर काढतो.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @bleu.rays या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत १९ मिलियनहून अधिक व्ह्युज आणि आठ लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.

तसेच एका युजरनं यावर लिहिलंय, “खूप वाईट.” तर दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “त्यांच्या घरच्यांचं लक्ष कुठे होते?” तिसऱ्या युजरनं लिहिलंय, “पालकांनो, तुमच्या मुलांची काळजी घ्या.”