Viral Video: आजकाल डान्स ही अनेकांची आवडती कला झाली आहे. आजकालचे पालक तर मुलांना लहानपणापासूनच डान्स क्लासला घालतात. सोशल मीडियावरील गाणी दाखवून नाचायला लावतात. आपल्या मुलाने इतरांप्रमाणे खूप छान डान्स करावा, सोशल मीडियावर प्रसिद्ध व्हावे असे अनेकांना वाटते. हळूहळू याची आवड मुलांनाही लागते. परंतु, सोशल मीडियावर हल्ली लाखो डान्स करणाऱ्या युजर्सचे व्हिडीओ समोर येतात. मात्र, त्यातील काही मोजक्याच लोकांना भरपूर प्रसिद्धी मिळते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक चिमुकली नाचताना दिसत आहे.
लहान मुलं खूप निरागस असतात. ते ज्या गोष्टी पाहतात, ऐकतात त्याच गोष्टी त्यांच्या डोक्यात सुरू असतात, त्यामुळे मुलांना लहानपणापासून नेहमी चांगल्या गोष्टी शिकवाव्या असे म्हटले जाते. मुलांना एखादं नवीन गाणं किंवा डान्स दाखवला की ते देखील हळूहळू ते करायला लागतात. या व्हायरल व्हिडीओतील चिमुकलीही असंच करताना दिसत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकली ‘मेरे ढोलना सुन’ गाण्यावर नाचताना दिसत आहे. यावेळी चिमुकलीच्या चेहऱ्यावरील हाव-भाव आणि डान्स स्टेप्स खूपच निरागस पद्धतीने करताना ती दिसत आहे. तिच्या या डान्सचे अनेक जण कौतुक करत आहेत.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @statemirrornews या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत चार मिलियनहून अधिक व्ह्युज आणि एक लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. यावर अनेक युजर्स कमेंट्स करतानाही दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
एकाने लिहिलंय की, “क्यूट मंजुलिका,” तर दुसऱ्याने लिहिलंय की, “मजेशीर आहे व्हिडीओ.” तर तिसऱ्याने लिहिलंय की, “सुंदर डान्स.” तर आणखी एकाने लिहिलंय की, “हिला पाहून आम्हाला हसू आलं.”