Viral Video: हल्लीची ही मुलं सोशल मीडियावरील बदलत्या ट्रेंडनुसार वागताना, बोलताना दिसतात. सोशल मीडियाप्रति मुलांमध्ये खूप उत्सुकता आणि आकर्षण आहे. मोठ्यांप्रमाणेच लहान मुलंदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली कला सादर करताना दिसतात. आतापर्यंत आपण अनेक व्हायरल व्हिडीओ पाहिले आहेत. दरम्यान, आता अशाच एका गोड चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होतोय, जो खूप चर्चेत आला आहे.
सोशल मीडियावर कधी कुठलं गाणं मोठ्या प्रमाणात चर्चेत येईल, हे सांगता येत नाही. या चर्चेत असलेल्या गाण्यांवर प्रत्येक वयोगटातील लोक, मोठमोठे कलाकारही ठेका धरताना दिसतात. हल्ली कधी ‘स्वप्नात आली राणी मुखर्जी’, हे गाणं तर कधी ‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’ ही गाणी खूप चर्चेत आहेत, ज्यावर लाखो युजर्स रील्स बनवताना दिसत आहेत. आताही असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकली ‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’ या सध्या चर्चेत असलेल्या मराठी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यावेळी तिच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि डान्स स्टेप्सही अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
पाहा व्हिडीओ:

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @adira_chavan या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत एक मिलियनहून अधिक व्ह्युज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करीत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय “खूप सुंदर डान्स” आणखी एकाने लिहिलेय, “मस्त” आणखी एकाने लिहिलेय, “खूप क्यूट.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video small girl dance on baya mazya bankura mangta marathi song sap