Viral Video: लहान मुलांचे अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहतो, ज्यात ती मुलं बिनधास्त डान्स करताना किंवा गाणं गाताना, अभिनय सादर करताना दिसतात. चिमुकल्यांच्या या व्हिडीओंना लाखो व्ह्युज आणि लाइक्सही मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात एक लहान मुलगी सुंदर डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून, नेटकरीही त्या मुलींचं कौतुक करताना दिसत आहेत.
हल्लीची लहान मुलं पटकन नवनवीन गोष्टी शिकतात. एखादं नवीन गाणं आलं की, ते त्यांना नेहमीच तोंडपाठ असतं. त्याशिवाय गाण्यातील डान्स स्टेप्सवरही त्यांचं अचूक लक्ष असतं. आता असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकली “काखेत कळसा गावाला वळसा”, या गाण्यावर खूप जबरदस्त डान्स करताना दिसतेय. यावेळी चिमुकलीच्या एकापेक्षा एक सुंदर डान्स स्टेप्स करताना दिसतेय, तसेच तिच्या चेहऱ्यावरचे हावभावही खूप सुंदर आहेत.
पाहा व्हिडीओ:
हा सोशल मीडियावर खूप चर्चेत असलेला व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @adira_chavan या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला एक लाखाहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक नेटकरी यावर विविध कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलंय, “सर्वात बेस्ट डान्सर.” दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “सर खूप भारी नाचतेस” तिसऱ्या युजरनं लिहिलंय, “व्वा, खूप सुंदर”