Viral Video: समाजमाध्यमांवर सातत्याने विविध वयोगटांतील लोकांचे, विविध देशांतील, विविध भाषांचे अनेक व्हिडीओ दररोज व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ ठरवून शूट केले जातात; तर काही व्हिडीओ एखाद्याच्या नकळत शूट केले जातात. अशा पद्धतीचे खरे व्हिडीओ पाहायला युजर्सनाही खूप आवडतात, ज्यात अनेकदा डान्सचे व्हिडीओही पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर अशाच प्रकारचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात एका चिमुकलीचा डान्स पाहायला मिळत आहे.

समाजमाध्यम वापरकर्त्यांसाठी रस्त्यावर डान्स करणाऱ्यांचे विविध व्हायरल व्हिडीओ पाहणं नवीन गोष्ट नाही. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. कधी मुंबई लोकलमध्ये, तर कधी दिल्ली मेट्रोमध्ये रील्स बनवणाऱ्यांचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. त्यातील काही व्हिडीओ पाहण्यासारखे असतात; तर काही व्हिडीओ पाहून अक्षरशः डोक्यात तिडीक जाते. असे व्हिडीओ केवळ लोकांना आकर्षित करण्यासाठी आणि जास्तीत जास्त लाइक्स, व्ह्युज मिळविण्यासाठी केले जातात. पण, आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील चिमुकलीला या कशाचंच काही देणं-घेणंनाही. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता. यावेळी ती फक्त तिच्या आनंदासाठी आवडीनं डान्स करताना दिसत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ एका गावातील आहे. त्यामध्ये एक चिमुकली त्यांच्या घराच्या टेरेसवर ‘साजन जी घर आये’, या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हे गाणं चिमुकलीच्या घराशेजारी असलेल्या कार्यक्रमात लावण्यात आले होते. चिमुकली या गाण्यावर खूप छान डान्स करते. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @suman_roy76 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत जवळपास अनेक लाइक्स आणि व्ह्युज मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.

या व्हिडीओवर एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “खूप छान”. दुसऱ्या युजरने लिहिलेय, “निरागस”. तर तिसऱ्याने लिहिलेय, “खूप सुंदर डान्स बेटा”.