Viral Video: सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल हे सांगता येत नाही. सोशल मीडियावरील ट्रेंड सतत विविध गोष्टींमुळे बदलत असतो. कधी थरकाप उडवणारे व्हिडीओ, तर कधी आपले मनोरंजन करणारे व्हिडीओ सातत्याने आपल्या डोळ्यांसमोर येतात. बऱ्याचदा यावर असे काही व्हिडीओ व्हायरल होतात, ज्यात नकळत घडलेल्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. सध्या दोन चिमुकल्यांचा असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात ते असं काहीतरी करताना दिसत आहेत, जे पाहून तुम्ही कपाळावर हात मारून घ्याल.

लहान मुलं कितीही निरागस असली तरीही ती कधी काय करामत करतील हे सांगता येत नाही. आपण काय करतोय आणि हे केल्यानंतर पुढे काय होईल? याची कल्पना त्यांना नसते. त्यामुळेच अनेकदा आई-वडिलांच्या नकळत ते अशा काही गोष्टी करतात, ज्यामुळे संपूर्ण कुटुंब त्रस्त होते. सध्या अशाच प्रकारचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात आपल्या बाबांच्या मागे बसून प्रवास करणारी दोन लहान मुलं असं काहीतरी करतात, जे पाहून नेटकरी अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.

pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Video of couple kissing metro station platform
मेट्रो स्टेशनवर ‘किस’ करणाऱ्या जोडप्याचा ‘तो’ Video Viral; नेटकरी म्हणे, “यात गैर काय”
small girls in the street
‘मोठा मॅटर झाला…’ गल्लीतल्या दोन मुलींचं झालं भांडण; एकमेकींना धमकी देत असं काही म्हणाल्या… VIDEO पाहून हसाल पोट धरून
Sharad Pawar
“राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”
learn how to save money from a lady
सेव्हिंग करणे कोणी यांच्याकडून शिकावं! गल्ला फोडला अन्…पाहा Viral Video

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका रस्त्यावरून आपल्या वडिलांसह दोन लहान मुलं बाईकवरून प्रवास करत असून यावेळी ती मुलं वडिलांच्या मागे बसून फ्रेंच फ्राईज खाताना दिसत आहेत. फ्रेंच फ्राईज खाता खाता ही मुलं सॉस वडिलांच्या पाठीला लावतात आणि तोच सॉस फ्राईजला लावून खातात. त्यामुळे वडिलांचा पांढरा शर्ट मागून पूर्णपणे खराब होतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे.

हेही वाचा: ‘देवा असा अंत नको…’ सिंहाच्या शावकांचा म्हशीवर क्रूर हल्ला; पुढे जे घडलं.. VIDEO पाहून नेटकरीही हळहळले

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @baby_lovings या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर आतापर्यंत ९२ मिलियन व्ह्यूज आणि पाच मिलियनहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करतानाही दिसत आहेत.

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “मुलं खूपच आगाऊ आहेत.” तर दुसऱ्या युजरने लिहिलेय, “बाबा खूपच कुल आहेत यांचे.” तर तिसऱ्या व्यक्तीने लिहिलेय, “मला त्यांचे बाबा आवडले”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “अशी मुलं नको रे देवा.”

Story img Loader