Viral Video: शाळा म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर आठवणीतले सुंदर क्षण उभे राहतात. शाळेतले दिवस कधीही न विसरण्यासारखे असतात. शाळेत केलेला अभ्यास, मजा-मस्ती, भांडणं नेहमीच प्रत्येकाच्या आठवणींत घर करून राहतात. त्याशिवाय शाळेतल्या गोड गमतीजमती आणि मित्र मैत्रिणी, शिक्षकांनी शिकवलेल्या कविता, गोष्टी नेहमीच आपल्या स्मरणात असतात. हल्ली सोशल मीडियामुळे अनेक शाळांमधील विविध गमतीशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आतादेखील एक चिमुकल्याचा असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय; ज्यात तो असं काहीतरी बोलत आहे, जे एकूण तुम्हीही पोट धरून हसाल.
शहरातील मोठमोठ्या शाळांतील विद्यार्थी असोत किंवा एखाद्या खेडेगावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारे विद्यार्थी; प्रत्येकामध्ये काही ना काही कला असते. सोशल मीडियावर जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांचे व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. त्यात विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारच्या कला सादर करताना दिसतात. त्यामध्ये कधी ते सुंदर डान्स करताना; तर काही जण सुंदर भाषण करताना दिसतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील मुलगा त्याच्या गावरान स्टाईलमध्ये बोलताना दिसतोय. खरं तर त्या चिमुकल्याला तो जे काही बोलत आहे, ते सोशल मीडियावर एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होईल याची कल्पनाही नसेल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका वर्गामध्ये काही लहान मुलं अभ्यास करताना दिसत आहेत. यावेळी त्यातील एक जण आपल्या शिक्षिकेला वाघाबद्दल काहीतरी सांगताना दिसतोय. त्यावेळी तो चिमुकला त्याच्या गावरान भाषेत म्हणतो की, वाघ गुर्रS गुर्रSS करतंय, नुसतं रक्त पेतंय.. चिमुकल्याचं हे बोलणं एकूण यावेळी आसपासचे सर्व जण मोठमोठ्याने हसू लागतात. त्यानंतर त्याची शिक्षिका त्याला विचारते की, तुला कोणी सांगितलं वाघ रक्त पितो ते… त्यावर तो म्हणतो की, माझ्या गंधाआत्यानं सांगितलं… तिच्या मोबाईलवर आलंय ते…” चिमुकल्याचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हेही वाचा: ‘आई जेवताना मोबाईल वापरू नको…’ चिमुकल्याने आईला दिला लाखमोलाचा सल्ला; पाहा मजेशीर VIDEO
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @ranjanajadhav1000 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत २३ हजारांहून अधिक व्ह्युज आणि अनेक लाइक्सही मिळाल्या आहेत. या व्हिडीओवर एका युजरनं लिहिलंय, “सुंदर व्हिडीओ.” दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “गणू, दादाच्या मोबाईलचा स्पीकर गेला असेल मग.” तिसऱ्या युजरनं लिहिलंय, “बाळांनो, भारी बोललात मॅडम तुमच्याबरोबर”, आणखी एकानं लिहिलंय, “खूप छान.”