सापाचे नाव ऐकताच अनेकांची हवा टाईट होते. आतापर्यंत सापाला पाहिलं की अनेकांची घाबरगुंडी उडाल्याचे व्हिडीओ तुम्ही आतापर्यंत पाहिले असतील. हे व्हिडीओ पाहून अंगावर अक्षरशः शहारे येतात. पण माणसाला पाहून साप घाबरलेला तुम्ही कधी पाहिलाय का ? होय, तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण हा साप इतका ड्रामेबाज निघाला की त्याच्या ड्रामापुढे बडे बडे अभिनेते सुद्धा फिके पडतील. सध्या याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सापाचे व्हिडीओ पाहून भीती वाटते असते, पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आवरणार नाही.
सोशल मीडियावर धक्कादायक आणि मजेदार व्हिडीओंसाठी प्रसिद्ध असलेल्या व्हायरल हॉग या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही भीती वाटणार नाही तर हसू येईल. व्हिडीओमध्ये एक साप जमिनीवर असलेला दिसत आहे. तोंड वर करून तो व्यक्तीला पाहताना दिसून येतोय. एक व्यक्ती या सापाला त्याच्या हाताने स्पर्ष करतो. नुसतं सापाला पाहिलं तर माणूस भीतीने थरथर कापतो. पण या माणसाने अगदी सहज या सापाला स्पर्श केला. सापाला स्पर्श केल्यानंतर तो या व्यक्तीला दंश करतो की काय अशी भीती सुद्धा मनात येत असते. पण सापाला स्पर्श केल्यानंतर तो व्यक्तीला दंश केला नाही की आपला फणा सुद्धा काढला नाही.
आणखी वाचा : कॉपी करण्याच्या नादात थेट चिखलाच्या डबक्यात कोसळली मुलगी..; VIRAL VIDEO पाहून पोट धरून हसाल
या व्यक्तीने जसंच या सापाला स्पर्श केला, त्यानंतर हा साप तोंड मोठं करत आपलं जीभ बाहेर काढतो आणि जमिनीवर कोसळतो. जेव्हा या सापाने त्याचं तोंड मोठं केलं आणि जीभ बाहेर काढली त्यावेळी थोड्या वेळासाठी असं वाटतं की आता हा साप व्यक्तीला दंश करणार, पण हा साप दंश न करता जमिनीवर कोसळून जातो, हे पाहून आश्चर्य वाटतं. हा साप मेला की काय असं वाटू लागतं. पण केवळ हात लावल्यानंतर या सापाला अचानक असं काय झालं की हा साप लगेच मेला सुद्धा, असे अनेक प्रश्न मनात येऊ लागतात. पण थोडं थांबा.
आणखी वाचा : कर्करोगाशी लढा देणाऱ्या ७७ वर्षीय आजोबांचा आईस स्केटिंग डान्सचा VIDEO VIRAL, पाहून तुम्ही व्हाल भावूक
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
कारण हा साप मेलेला नसतो तर तो मेल्याचं नाटक करतोय. सापाचा हा ड्रामा पाहून लोकांच्या चेहऱ्यावर स्माईल आल्याशिवाय राहत नाही. हा व्हिडीओ सध्या लोकांना खूपच आवडला आहे. या व्हायरल व्हिडीओमधला साप हॉग्नोज जातीचा साप असल्याचं सांगण्यात येतंय. या जातीचे साप पूर्व-मध्य मिनेसोटा, विस्कॉन्सिन ते दक्षिणी ओंटारियो, कॅनडा आणि दक्षिणी न्यू हॅम्पशायर, दक्षिण फ्लोरिडा आणि पश्चिम ते पूर्व टेक्सास आणि पश्चिम कॅन्ससपर्यंतच्या भागात आढळतात. हे साप नेहमी मरणाचं नाटक करत असतात.
आणखी वाचा : पाकिस्तानी तरुणीचा भाजी बनवतानाचा नवा VIRAL VIDEO, लोक म्हणाले, “तुम्ही फक्त व्हिडीओसाठी काम करता का?”
सोशल मीडियावर या सापाच्या व्हिडीओला नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळतेय. आतापर्यंत या व्हिडीओला ८८ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. अशा ड्रामेबाज सापाचा व्हिडीओ तुम्ही यापूर्वी कधी पाहिला नसेल. हा व्हिडीओ पाहून लोकांनी या सापाच्या ड्रामेबाजीवर आपल्या वेगवेगळ्या मजेदार कमेंट्स शेअर करण्यास सुरूवात केलीय.