सोशल मीडिया मनोरंजक कथा आणि व्हिडीओने भरलेले आहे. काही व्हिडीओ तर खूप भावनिक असतात. अलीकडेच, असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनु नावाच्या विशेषतः सक्षम फळ विक्रेत्याची कथा आहे.जेव्हा युट्युबर टेड कुंचोक एका सुंदर आणि नयनरम्य हिल स्टेशनवर फिरायला जातो. तेव्हा त्याने रस्त्याच्या कडेला एक फळ विक्रेता बसलेला पाहिला आणि त्यांच्यासोबतच्या अनुभवाचा त्याने व्हिडीओ केला. १० मिनिटांच्या या हृदयस्पर्शी व्हिडीओमध्ये जे दिसले ते आपल्याला आजच्या जगात करुणा आणि दयाळूपणा किती महत्त्वाचे आहे याची जाणीव करून देते.

टेड कुंचोकने कॅप्चर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याने प्रथम फळ विक्रेत्याशी संवाद साधला आणि लवकरच त्याला कळले की तो माणूस विशेष अपंग आहे. त्याच्या व्यवसायाबद्दल आणि तो संत्रे का विकतो? याबद्दल विचारले असता अनुने सांगितले की त्याची आई घरी आजारी असल्याने तो काही काळापासून संत्री विकत आहे. तो असेही म्हणतात की साथीच्या आजारामुळे पर्यटकांची संख्या कमी झाल्यामुळे व्यवसाय कमी झाला आहे.

व्हायरल व्हिडीओ: एका लहान कोळ्याने मोठ्या सापाला बनवले शिकार; नेटीझन्सने वक्त केले आश्चर्य

अनुसमोर अनेक आव्हाने असली तरी तो आपले स्मित राखतो आणि कमावण्याचा प्रयत्न करतो. तो युट्युबरला विचारतो की तो सर्व संत्री खरेदी करण्यास तयार आहे का? तेव्हा टेड कुंचोक सर्व फळे खरेदी करतो. नंतर व्हिडीओमध्ये, तो त्याला अजून काही अतिरिक्त पैशांची मदत करताना देखील पाहू शकतो.

पिकअप ट्रकच्या हुडखाली खारुताईने लपवले १५८ किलो अक्रोड; फोटो व्हायरल

व्हिडिओ अपलोड झाल्यापासून, त्याला १.३ दशलक्षहून अधिक व्ह्यूज आणि ८९ हजार कमेंट्स मिळाल्या आहेत. यासाठी टेडचे ​​अनेक लोकांनी कौतुक केले आहे. एका व्यक्तीने लिहिले, “आम्ही इथे जे पाहतो ते फक्त एक अपंग तरुण नाही, आपण जे पाहतो ते सुंदर मानवता, प्रेम आणि सभ्यता आहे” दुसरा लिहतो “हेबघून खरोखर माझ्या हृदयाला स्पर्श केले. माझ्याकडे शब्द नाहीत. त्याला कधी इजा होऊ नये.” तिसऱ्या वापरकर्त्याने असेही म्हटले, “आपल्या सहकारी मानवांसाठी करुणा ही अशी गोष्ट आहे ज्याची या जगात उणीव आहे.”

Story img Loader