मुलगी आणि वडील यांचे नाते हे अतिशय खास नाते असते. या नात्यात एकप्रकारचा गोडवा असतो. वडिलांसाठी मुलगी ही राजकन्येपेक्षा कमी नसते. प्रत्येक मुलगी आपल्या वडिलांना बालपणात एक सुपरहिरो म्हणून पाहते. मुलीला वाटत असते की आपला बाप काहीही करू शकतो. कुठलीही मुलगी जर डोळे झाकून एखाद्या पुरुषावर विश्वास ठेवू शकते तर ते फक्त तिचे वडिल असतात. एखाद्या वडिलांसाठी त्यांची मुलगी खास असते तेवढंच एका मुलीसाठी तिचे वडिलही खूप स्पेशल असतात. दोघांच्या या नात्याचे अनेक उदाहरणं, फोटो, व्हिडीओ आपण पाहिले आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सगळ्यांना भावुक करत आहे.

बाप बाप असतो…

म्हणतात ना बाप-लेकीच्या प्रेमात त्यांचे पैसे, ते कोणत्या घरात जन्माला आले हे मॅटर करत नाही. त्यांच्या आयुष्यातले अगदी छोटे छोटे क्षणही त्यांच्या घट्ट नात्यासाठी पुरेसे असतात. याचंच दर्शन या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवरुन होतं. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पहायला मिळतंय की,  एक दिव्यांग व्यक्ती आपल्या मुलीसोबत तिच्या शाळेतील एका कार्यक्रमात डान्स करताना दिसत आहे. स्टेजवर इतर मुलींसह त्यांचे वडिल डान्स करत आहेत. मात्र दिव्यांग असूनही हा व्यक्ती केवळ आपल्या मुलीच्या आनंदासाठी जमेल त्या पद्धतीनं खुर्चीवर बसून मुलीसाठी डान्स करत आहे.

Gashmeer Mahajani
“परत तिच्या कुशीत…”, गश्मीर महाजनी आईबद्दल बोलताना म्हणाला, “घरी दोन लहान मुलं…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Mother Always Protect Her Child
आई आहे ना…! वेगात येणारी राईड पाहून चिमुकलीने काढला पळ अन् पाहा VIDEO चा जबरदस्त शेवट
Viral Video Shows Father And Daughter love
‘काय ते छोटे छोटे घास, काय ते तोंड पुसणे…’ एकाच ताटात बाबांबरोबर जेवणारी लेक; पहिला घास लेकीला, तर दुसरा… VIDEO व्हायरल
Mother love shocking video woman Went To Buy Milk for her baby And The Train Started Emotional Video
भुकेल्या बाळाला दूध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी
Shocking video Bride's Mother Cancels Wedding In Bengaluru After Groom's Drunken Misbehaviour video
VIDEO: “लेकीपेक्षा महत्त्वाचं काहीच नाही” लग्नात दारु पिऊन पोहोचला नवरदेव; नवरीच्या आईनं भर मांडवात काय केलं पाहा
Video of children warkari dance on bhajan songs
संस्कार याच वयात होतात! चिमुकले वारकरी थिरकले भजनाच्या तालावर, VIDEO एकदा पाहाच
Daughter Made Shirt For Dad
‘फक्त लाडक्या बाबांसाठी…’ लेकीने शिवला खास शर्ट; ‘तो ‘खास मेसेज पाहून भारावून जाईल मन; पाहा रिक्षाचालकाचा Viral Video

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – escalator accident: अचानक तुटला एस्केलेटर आणि पूर्णपणे आत गेली व्यक्ती, video बघून तुम्हीही हादराल

या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. हेच छोटे छोटे क्षण नातं घट्ट करण्यासाठी मदत करतं. छोट्या छोट्या गोष्टींमध्येही मोठा आनंद शोधल्यावर नातं टिकून राहतं.

Story img Loader