पुष्पा सिनेमाने लोकांच्या मनावर राज्य केलं आहे. याच्या डायलॉगपासून ते, कलाकार आणि गाण्यांपर्यंत सगळ्याच गोष्टीची लोकांना भूरळ पडली आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर देखील बरेच लोक याच्या डागलॉगने, स्टाईलने आणि गाण्याच्या स्टेपला कॉपी करत आहेत. पुष्पा हा असा सिनेमा आहे, ज्याने सगळे रेकॉर्ड मोडले आहेत आणि अवघ्या कमी वेळेत फार प्रसिद्धी मिळाली आहे. आतापर्यंत क्वचितच असा कोणा व्यक्ती असेल ज्याने पुष्पा सिनेमा पाहिला नसेल. अगदी लहानांपासून ते ज्येष्ठापर्यंत सर्वांवर ‘पुष्पा’ फिवर चढला आहे. अशात आता एअर होस्टेसवर सुद्धा पुष्पा फिवर चढलाय. या एअर होस्टेसने चक्क विमानातच पुष्पा डान्स केलाय. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुम्ही सुपरस्टार अल्लूचा श्रीवल्ली किंवा रश्मीकाचा सामी सामी गाण्याचा व्हिडीओ तुम्ही युट्यूबर देखील पाहिला असेल. तसंच अनेक लोकांनी या गाण्यावर आपले वेगवेगळे रिल्स बनवलेले देखील तुम्ही पाहिले असेल. एवढंच काय तर या सिनेमातील डायलॉग आणि स्टाईलचीही कॉपी करताना तुम्ही अनेक लोकांना पाहिलं असेल. ‘पुष्पा’ चित्रपटातील सुपरस्टार अल्लू अर्जुनची हूक स्टेप बरीच गाजलेली आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये सुंदर एअर होस्टेसने सुद्धा हीच हूक स्टेप करण्याचा प्रयत्न केला खरा, ही स्टेप तिला हशी तशी जमलेली नाही. पुष्पामधली हूक स्टेप करता करता तिच्याकडून एक चूक होते. याचा ब्लुपर व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केलाय.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : नवरी-नवरदेवावर पैसे उडवण्याचा उत्साह नडला, थेट नवरदेवाच्या मांडीवर जाऊन पडला

या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एअर होस्टेस अल्लू अर्जुनची हुक स्टेप नीट समजू शकली नाही. पण तरीही ती प्रयत्न करताना दिसतेय. नंतर या एअर होस्टेसलाच स्वतःला कळतं की तिने हुस स्टेप सगळी बदलून टाकली आहे. त्यामुळे नंतर ती स्वतःच्याच डान्सवर हसताना दिसत आहे. हा व्हिडीओ तिच्या एका साथीदाराने रेकॉर्ड केला होता. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : बकरीसोबत व्हिडीओ शूट करणं पडलं महागात, मग पुढे जे झालं ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : या कलाकाराच्या कलाकृतीला सलाम!, गोठलेल्या बर्फात बनवला महाकाय साप, पाहा हा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ तिने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये डान्स करणाऱ्या एअर होस्टेसचं नाव उमा मीनाक्षी असून ती स्पाइसजेटच्या फ्लाइटची एअर होस्टेस आहे. ती इन्स्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहे. यापूर्वी तिने फ्लाइटमध्येच ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘सामी सामी’ या आणखी एका गाण्यावर डान्स केला होता. जो लोकांना खूप आवडला होता. उमाच्या या व्हिडीओवर हजारो लाईक्स आणि कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video spicejet air hostess failed attempt at allu arjuns pushpa hook step is hilarious prp