Viral Video: समाजमाध्यमांमुळे लाखो नवनवीन व्हिडीओ आपल्या नजरेस पडतात. त्यातील काही व्हिडीओ आपलं मनोरंजन करतात, आपल्याला नवीन गोष्टी शिकवतात, तर काही व्हिडीओ नकळत डोळ्यांत पाणी आणतात. अशा व्हिडीओंमध्ये कधी एखाद्या मुक्या प्राण्यावर किंवा व्यक्तीवर अत्याचार होत असल्याचं पाहायला मिळतं; तर कधी एखाद्या निष्पाप व्यक्तीचा लोक गैरफायदा घेताना दिसतात. पण, म्हणतात ना ज्याप्रमाणे चांगल्या गोष्टी कधीही लपून राहत नाहीत. त्याचप्रमाणे तुम्ही करीत असलेल्या चुकीच्या वाईट गोष्टीही कधीही लपून राहत नाहीत. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

कोणतीही परस्थिती असो; रागावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. पण, हल्ली अनेक जण समोरचा एखादा शब्द आपल्याबद्दल वाईट बोलला की, लगेच त्याच्यावर तुटून पडतात. खरं तर यात चूक दोघांचीही असते. पण, दोघांपैकी निदान एकानं तरी कमीपणा घेऊन माघार घ्यायला हवी. पण, लोक याउलट समोरच्यानं एक दिली म्हणून त्याला १०-१२ वेळा कानशिलात लगावतात. सध्या एका एसटी स्टँडवरील अशीच एक घटना पाहायला मिळत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका एसटी बसस्टँडवर ड्रायव्हर एका वृद्ध व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहे. तो त्याला जा, असं म्हणतोय, त्यावर वृद्ध माणूस सर्वांत आधी ड्रायव्हरवर हात उचलतो, त्यानंतर ड्रायव्हरही त्याला बेदम चोप द्यायला सुरुवात करतो. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @punecitylive.news.pune या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत अनेक व्ह्युज आणि लाइक्सही मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करतानाही दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ:

एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलंय, “आजोबापण कमी नाही. आधी त्यांनीच सुरुवात केली”. दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “चूक कुणाची आहे हे आपल्याला माहीत नाही; पण.. सध्याची सत्य परिस्थिती अशी आहे की, सामान्य माणूसपण सरकारी नोकरदाराला आपला नोकर असल्यासारखी वागणूक देतात”. तिसऱ्या युजरनं लिहिलंय, “टाळी एका हातानं वाजत नसते. काय तरी बोलले असणार आजोबा”.