Viral Video: लग्नसमारंभ म्हटलं की नाच-गाणी, मजा-मस्ती, दंगा पाहायला मिळतोच. लग्नातील विविध प्रथांमध्ये खूप गमतीशीर गोष्टी पाहायला मिळतात. लग्नात हार घालण्यावरूनही अनेकदा गोंधळ उडतो; तर कधी नवऱ्या मुलाचे बूट चोरण्यावरूनही राडा झालेला पाहायला मिळतो. अनेकदा काही लग्नांमध्ये वर पक्ष आणि वधू पक्षामध्ये भांडणं झालेली पाहायला मिळतात. शिवाय कधी कधी नवरदेवाचे अतरंगी मित्र त्याच्याबरोबर काही प्रँक करताना दिसतात. आताही असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीही कपाळावर हात मारून घ्याल.
काहींचं लग्न त्यांच्या आवडीच्या व्यक्तीबरोबर होतं तर काहींचं लग्न घरच्यांनी ठरवलेल्या व्यक्तीबरोबर होतं. जेव्हा घरचे लग्न ठरवतात, तेव्हा बरेच जण आपलं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे, त्या व्यक्तीला विसरून जायचा प्रयत्न करतात आणि नव्या आयुष्याची सुरुवात करायचं ठरवतात. परंतु, अनेकदा समोरची व्यक्ती ते प्रेम विसरायला तयार नसते. अनेक चित्रपट, मालिकांमध्ये तुम्ही अशा घटना पाहिल्या असतील, ज्यात एखाद्या तरुणीच्या मनाविरूद्ध होत असलेल्या लग्नात तिचा प्रियकर पोहोचतो आणि तिच्याशी लग्न करतो किंवा तिला मंडपातून पळवून घेऊन जातो. या सर्व घटना काल्पनिक वाटत असल्या तरी हल्ली अशा घटन खऱ्या आयुष्यातही होताना दिसतात. नुकत्याच काही दिवसांपूर्वी असा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. दरम्यान, आता असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका लग्नमंडपामध्ये वधू-वराला भेटण्यासाठी वराचे मित्र आले असून, यावेळी एक तरुणी तिथे स्टेजवर येते आणि वराला सरळ जाऊन मिठी मारते. यावेळी वर सुन्न होतो. त्यानंतर मिठी मारलेली तरुणी त्याच्या कानात काहीतरी सांगते, जे ऐकून तो हसायला सुरुवात करतो. त्यानंतर वधूदेखील हसायला सुरुवात करते, कारण यावेळी मिठी मारण्यासाठी आलेली तरुणी ही तरुणी नसून वराचा मित्र होता, जो मुलीचे कपडे घालून आला होता. सध्या हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @marathi_royal_karbhar या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून याला आठ मिलियन्सहून अधिक व्ह्युज मिळाल्या आहेत, तर एक लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.
एका युजरने लिहिलंय की, “भाऊ पुरा शॉक झाला”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “सगळे जुने मॅटर आठवले असतील..”, तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “भाऊ आठवतोय नेमक कोण असेल”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “असले मित्र ठेवायचेच नाहीत बाबा.”