Viral Video: सकाळचा नाश्ता म्हणून, तर कधी रात्री २ वाजता भूक लागते म्हणून दोन मिनिटांत झटपट होणारी मॅगी खायला सर्वांनाच आवडते. मॅगीनंतरही अनेक ब्रॅण्ड्स बाजारात आले; पण मॅगी ही लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व ग्राहकांची नेहमीच पहिली पसंती ठरली. आज सोशल मीडियावरही मॅगीशी संबंधित एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; जो पाहून तुम्ही नक्कीच डोक्याला हात माराल.

रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्या विक्रेत्यांचे व्हिडीओ नेहमीच खाद्यप्रेमींना आकर्षित करतात. हातगाडीवरून अनेकदा कप-बशी, भाजी किंवा आणखीही काही वस्तू विकताना अनेक विक्रेते तुम्हाला दिसतात. पण, आज व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत एक विक्रेता चक्क मॅगी विकताना दिसून आला आहे. आता तुम्ही म्हणाल यात काय वेगळं आहे. तर हा विक्रेता पॅकेटमधील मॅगी कांदे, बटाटे जसे विकले जातात त्याप्रमाणे मॅगीही विनापॅकेट उघड्यावर विकताना दिसून आला आहे. एकदा तुम्हीसुद्धा पाहा या विक्रेत्याचा व्हिडीओ.

Maharashtrachi Hasyajatra Fame prithvik Pratap share funny video with wife
Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Heartwarming Message written by a young man on Makar Sankranti
Video : “माणूस तेव्हाच गोड बोलतो..” तरुण खरं बोलून गेला; नेटकरी म्हणाले, “१०० टक्के खरं आहे”
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
a newlywed bride said a beautiful ukhana for husband
Ukhana Video : “रुख्मिणीचा कृष्ण, सीतेचा राम…” नवरीने घेतला सुंदर उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Jahnavi Killekar And Nalinee Mumbaikar
जान्हवी किल्लेकर पोहोचली नलिनी काकूंच्या घरी! चुलीवर बनवलं ‘Banana Leaf पापलेट’, दोघींना एकत्र पाहून नेटकरी म्हणाले…
funny ukhana
“पुढच्या जन्मी मुकेश अंबानीच हवा”; काकूंचा उखाणा ऐकून काकांनी दोन्ही हात वर केले, पाहा मजेशीर Video
Unique way to remove peel garlic The Best Way to Easily Peel Garlic
महिलांनो हातही न लावता झटपट सोला लसूण; किलोभर लसूणही मिनिटांत होईल सोलून; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

हेही वाचा…चित्रकाराच्या कलेला सलाम! तिकिटावर ‘DDLJ’ चित्रपटातील ‘हा’ सीन हुबेहूब रेखाटला; VIDEO पाहून व्हाल थक्क…

व्हिडीओ नक्की बघा :

तुम्ही पाहिले असेल की, अगदी कांदे, बटाटे विकले जातात अगदी त्याचप्रमाणे हातगाडीवर हा विक्रेता मॅगी विकतो आहे. वजनकाट्यावर या मॅगीचे वजन करून, त्यात मॅगी मसाला देऊन प्लास्टिकच्या पिशवीतून तो ग्राहकांना देतो आहे. तसेच ग्राहकसुद्धा ही उघड्यावर विकली जाणारी मॅगी बिनधास्त विकत घेताना दिसत आहेत; जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @Chatore_Broothers या इन्स्टाग्रामवर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. काही जण संताप व्यक्त करून ही मॅगी एक्स्पायर्ड आहे असे सांगताना, तर काही जण मॅगीची हातगाडी पाहून मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसून आले आहेत. एकूणच सोशल मीडियावर या व्हिडीओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Story img Loader