Viral Video: २६ जानेवारी १९५० रोजी भारताच्या संविधानाला मान्यता मिळाली आणि खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक भारताची सुरुवात झाली. नुकत्याच काही दिवसांपूर्वी भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. हा दिवस दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. देशभरात सर्व नागरिक हा दिवस वेगवेगळ्या पद्धतीने या दिवस साजरा करतात. अनेक जण लोकप्रिय स्वातंत्र्यसैनिकांचे कपडे घालून येत त्यांचे स्मरण करतात; तर काही जण एखाद्या मेळाव्यात भारतीय संविधानाचे मोठ्याने वाचन करून संविधानाचे महत्त्व अधोरेखित करतात. तसेच शाळा, कॉलेज आणि सार्वजनिक ठिकाणी देशभक्तीवर आधारित गाणी, नृत्य आणि नाटकांचे सादरीकरण केले जाते. सध्या अशाच एका कार्यक्रमातील सादरीकरणाचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांच्या आहुती दिल्या. त्यात भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्या नावांच्या उल्लेख सगळ्यात आधी केला जातो. २३ मार्च १९३१ रोजी ब्रिटिश सरकारने त्यांना लाहोर तुरुंगात फाशीची शिक्षा सुनावली होती. या दिवशी देशभरात शहीद दिन साजरा केला जातो. देशात भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांचे जीवनचरित्र आणि शौर्यगाथा दाखविणारे अनेक चित्रपट आजवर प्रदर्शित झाले आहेत. तसेच त्यावर आजही नाटकांचे सादरीकरण केले जाते. २६ जानेवारी रोजी एका कार्यक्रमात याच नाटकाचे सादरीकरण झाले. परंतु नाटकादरम्यान, असे काहीतरी घडले, जे पाहून तुमचा डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, २६ जानेवारीला सादर झालेल्या एका कार्यक्रमात भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्या शौर्यगाथेवरील आधारित नाटकाच्या शेवटी त्यांना फाशी दिल्याची घटना दाखवली जाते. त्यामध्ये त्या तिघांच्या तोडांवर काळा कपडा बांधून, त्यांना फाशी दिली जाते. त्यावेळी तिघांच्या मानेभोवती असलेली दोरी हळूहळू वर सरकते आणि ते तिघेही खरोखरी फाशी दिल्याप्रमाणे लटकताना दिसतात. अर्थात, हा सर्व नाटकातील भाग होता. परंतु प्रेक्षकांमधील एका व्यक्तीला, त्या तिघांना खरेच फाशी दिली की काय असे वाटते. त्यामुळे तो स्टेजवर पळत येऊन, तिघांमधील एका कलाकाराचे पाय पकडून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो. यावेळी तेथे आलेल्या प्रेक्षकाला पाहून कार्यक्रमाच्या आयोजकांपैकी एक व्यक्ती तिथे येते आणि त्याला खाली जाण्यास सांगते. हा व्हायरल व्हिडीओ सध्या खूप चर्चेत असून, अनेक जण विविध कमेंट्स करताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ x वरील @ViralConte97098 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याला अनेक व्ह्युज आणि लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.