प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात शिक्षकांचे महत्व अनन्यसाधारण असते. चुकांवर विद्यार्थ्यांना ओरडणारा तर पैकीच्या पैकी गुण मिळाले की, कौतुकाची थाप देणारा तो शिक्षकच असतो. शिकवण्यापासून ते एक चांगला माणूस बनण्यापर्यंत शिक्षकांचा मोठा वाटा असतो. त्यामुळे विद्यार्थीसुद्धा शिक्षकांना सन्मान देत त्यांच्या वाढदिवसाचे हटके प्लॅन करताना दिसतात. पण, आज एक अनोखा व्हिडीओ समोर आला आहे; यात शिक्षिकेसाठी बेबी शॉवरचे आयोजन करण्यात आले आहे.

आतापर्यंत तुम्ही हॉल, घरी आदी ठिकाणी बेबी शॉवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं पाहिलं असेल. पण, आज काही विद्यार्थिनींनी मिळून वर्गात शिक्षिकेच्या बेबी शॉवरचं आयोजन केलं आहे. शिक्षिका या त्यांचा अनमोल वेळ कॉलेज किंवा शाळेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना देतात . बहुदा म्हणूनच या विद्यार्थिनींनी या खास कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे. तर हे खास सरप्राईज शिक्षिकेला कसं देण्यात आलं हे एकदा व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा पाहा.

Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
Girls group dance on marathi song Udhalit Yere Gulal Sajana Tu Sham Mi Radhika video goes viral
VIDEO: काय ती अदा, काय तो डान्स! “उधळीत येरे गुलाल सजना तू शाम मी राधिका” मराठमोळ्या गाण्यावर तरुणींचा तुफान डान्स
Aai Kuthe Kay Karte Fame Kaumudi Walokar Sangeet Ceremony
Video : “कौमुदी या अखंड ताऱ्यांच्या…”, फिल्मी स्टाइल प्रपोज, जबरदस्त डान्स अन्…; मराठी अभिनेत्रीचा ‘असा’ पार पडला संगीत सोहळा
Devar bhabhi Dance in marriage women started dancing on his devar entry trending video
VIDEO: “लो चली मै अपने देवर की बारात लेके” दीराच्या लग्नात वहिनीचीच चर्चा; असा डान्स केला की पाहुणेही झाले थक्क

हेही वाचा…कौतुकास्पद! श्वानाने शॉर्ट सर्किटपासून वाचवले मालकाचे घर; जळती वायर खेचली अन्… पाहा VIDEO

व्हिडीओ नक्की बघा :

व्हायरल व्हिडीओत शाळेतील काही शिक्षिका या शिक्षिकेला बेबी शॉवरची सजावट करण्यात आलेल्या वर्गात घेऊन येतात. वर्गात शिक्षिकेचा प्रवेश (एंट्री) होतो, तेव्हा फुलांचा वर्षाव करण्यात येतो. वर्गात बेबी शॉवरसाठी फुग्यांची सुंदर सजावट करण्यात केलेली पाहून शिक्षिकेला विश्वास बसत नाही. विद्यार्थिनींनी केलेली तयारी पाहून शिक्षिकेला रडू येतं, पण तितकाच आनंदही होतो.

तुम्ही व्हिडीओत पाहिलं असेल की, शिक्षिका वर्गात येताच विद्यार्थिनी ‘मॉम टू बी’ लिहिलेला सॅश त्यांच्या गळ्यात घालतात. त्यानंतर टेबलावर त्यांच्यासमोर केक ठेवण्यात येतो. तसेच या कार्क्रमासाठी त्यांनी काही शब्दात विद्यार्थिनींचे आभार सुद्धा मानले. वर्गात बेबी शॉवर असे इंग्रजी अक्षरात लिहिलेले फुगे, चमकणाऱ्या पताकांची सजावट, केक, मॉम टू बी मजूकर लिहिलेला सॅश आदींचा या सजावटीमध्ये समावेश असतो. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @perfectokay_andcrew.x__या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी विद्यार्थिनींचे विविध शब्दात कौतुक करताना आणि भावुक होताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.

Story img Loader