Viral Video: शाळा म्हटलं की, आपल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक गोड हसू येतं, शाळेतले दिवस कधीही न विसरण्यासारखे असतात. शाळेत केलेला अभ्यास, मजा-मस्ती, भांडणं नेहमीच प्रत्येकाच्या आठवणीत घर करून राहतात. शाळेतल्या गोड गमती-जमती आणि मित्र-मैत्रिणी, शिक्षकांनी शिकवलेल्या कविता, गोष्टी, वार्षिक समारंभात केलेला डान्स नेहमीच आपल्या स्मरणात असतो. सध्या एका जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थिनींचा असाच एक सुंदर व्हिडीओ व्हायरल होतोय.
सोशल मीडियावर आपण अनेकदा शाळा किंवा कॉलेजमधील विविध व्हिडीओ व्हायरल झाल्याचे पाहिले असेल. या व्हिडीओत कधी शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना कविता शिकविताना दिसतात; तर कधी काही विद्यार्थी डान्स, अभिनय किंवा इतर कला सादर करताना दिसतात. आताही एका जिल्हा परिषदेच्या शाळेतील व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात शाळेतील विद्यार्थिनी समारंभाआधी डान्सची तयारी करताना दिसताना दिसत आहेत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका शाळेतील काही विद्यार्थिनी शाळेतील वार्षिक समारंभासाठी डान्सची पूर्वतयारी करताना दिसत आहेत. यावेळी त्या शाळेच्याच गणवेशात स्टेजवर डान्स करीत आहेत. यावेळी ते ‘कुर्ची मदाथापेट्टी’ या तेलुगू गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. यावेळी त्यांच्या डान्स स्टेप्स खूप सुंदर असून, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावरही खूप व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @rupalisonawane1123 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत चार दशलक्षाहून अधिक व्ह्युज आणि एक लाखाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “पहिल्यांदा एवढी मोठी जिल्हा परिषदेची शाळा बघतोय.” आणखी एकाने लिहिलेय, “जिल्हा परिषद शाळेचा नाद नाही करायचा.”