Viral Video: हल्लीचे तरुण-तरुणी गाडी चालवताना रील्स काढणे, डान्स करणे, जीवघेणे स्टंट करणे, इतर गाड्यांना मागे टाकून पुढे जाण्याचा प्रयत्न करणे अशा अनेक गोष्टी करताना दिसतात. पण, अनेकदा या हलगर्जीपणामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागतो. या व्हिडीओमध्येही दोन तरुण आणि एक तरुणी असाच जीवघेणा स्टंट करत आहेत.

खरे तर तरुणपणीचा प्रत्येक क्षण आयुष्यात खूप महत्त्वाचा असतो. याच वयात केलेल्या चांगल्या कामाचे फळ आपल्याला भविष्यात मिळते. योग्य करिअर निवडण्यापासून ते अगदी योग्य जोडीदार निवडण्यापर्यंत या सर्व गोष्टी याच वयात निवडल्या जातात. काही तरुण या वयात कष्ट करून कुटुंबाची जबाबादारी पार पडतात, आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी झटतात; तर काही तरुण या वयात हुल्लडबाजी करताना दिसतात. आपण काय करतोय आणि काय करायला हवे याची त्यांना कल्पानाच नसते. आता असेच काही तरुण या व्हिडीओत पाहायला मिळत आहेत, जे पाहून तुम्हीही संताप व्यक्त कराल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका रस्त्यावरून दारू प्यायलेले दोन तरुण आणि एक तरुणी बाईकवरून जात असून, यावेळी तरुणी दोन तरुणांच्या मध्ये बसल्याचे दिसत आहे. यावेळी ती चालू बाईकवर उभी राहते आणि हात हवेत फैलावून स्टंट करू लागते. यावेळी तरुणीच्या मागे बसलेला तरुण तिच्या कंबरेला पकडतो. त्यानंतर ती तरुणी पुढे बसलेल्या बाईक चालवणाऱ्या तरुणावर तिचे अंग टाकते. यावेळी हा व्हिडीओ बाईकच्या मागून जाणारा एक कारचालक शूट करतो. यावेळी ती तरुणी त्या कारचालकालाही फ्लाईंग किस देते. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @aadhan_telugu या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर केलेल्या व्यक्तीने कॅप्शनमध्ये, ‘मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये तरुण-तरुणींनी दारूच्या नशेत धिंगाणा घातला. एकाच बाईकवर दोन तरुण बसले होते आणि ती तरुणी त्यांच्यामध्ये उभी राहून स्टंट करत होती’. त्याशिवाय या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास लाखो व्ह्युज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. त्याशिवाय अनेक नेटकरीदेखील यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ:

त्यावर एका नेटकऱ्याने लिहिलेय, “यांना तुरुंगात टाकून बेदम चोप द्यायला हवा”. आणखी एकाने लिहिलेय, “यांच्या घरचे यांच्या हातात गाडी का देतात”. आणखी एकाने लिहिलेय, “त्यांच्या आई-वडिलांना दुःख वाटत असेल अशा मुलांना जन्म दिला म्हणून”. तर आणखी एका युजरने लिहिलेय, “मूर्खपणा आहे”.

Story img Loader