Swiggy’s delivery boy helping his Zomato counterpart : Zomato आणि Swiggy अशी दोन फूड डिलिव्हरी अॅप्स आहेत, जी या क्षेत्रातील प्रसिद्ध नावं आहेत. हे दोघेही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेकदा आकर्षक ऑफर घेऊन येतात. अशा परिस्थितीत दोघांच्या डिलिव्हरी एजंटमध्येही सर्वात आधी फूड डिलिव्हरी करण्याची स्पर्धा लागलेली असते. हे तर सर्वांनाच माहित आहे. पण या स्पर्धेतही मैत्रीचं दर्शन घडवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. हा व्हिडीओ पाहून प्रत्येक जण खऱ्या मैत्रीची वेगवगेळी उदाहरणे देऊ लागला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ थेट लोकांच्या हृदयाला भिडला आहे. खरं तर, व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, बाईकवर स्वार असलेल्या एका स्विगी डिलिव्हरी एजंटने त्याच्या प्रतिस्पर्धी झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला मदत केली, ही मदत पाहून प्रत्येक जण या स्विगी डिलिव्हरी एजंटच्या प्रेमात पडू लागले आहेत. हा व्हायरल व्हिडीओ दिल्लीतला आहे. दिल्लीच्या कडक उन्हात हा झोमॅटो डिलिव्हरी बॉय सायकलवरून फूड डिलिव्हरीसाठी जात होता. तर स्विगीचा डिलिव्हरी बॉय बाईकवरून फूड डिलिव्हरीसाठी निघाला होता. झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला सायकलवरून जाताना पाहून स्विगीच्या डिलिव्हरी बॉयने एक अशी शक्कल लढवली की जेणेकरून भर उन्हात झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला पॅडल मारून सायकल चालवण्याचा त्रास कमी होईल.

आणखी वाचा : पावसाळ्यात छत्री सुकत नाही म्हणून असं करतं का कुणी? हा VIRAL VIDEO एकदा पाहाच!

स्विगीच्या डिलिव्हरी बॉयने झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयच्या हात पकडला. त्यामुळे स्विगीच्या डिलिव्हरी बॉयच्या बाईकबरोबरच झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयची सायकलही सहज पळू लागली. झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयची सायकल पॅडल न मारताच धावू लागली. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना जय-वीरूची ‘शोले’मधील मैत्री आठवली आहे. चला तर मग पाहुया हा सुंदर व्हिडीओ…

आणखी वाचा : VIRAL VIDEO : समुद्राचं मुंबईकरांना रिटर्न गिफ्ट; कित्येक टन प्लॅस्टिकचा कचरा साभार परत केला

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : कचऱ्यावरून महिलांमध्ये झालेल्या भांडणाचा VIDEO VIRAL, नाल्यातून गाळ काढून काय केलं पाहा…

मैत्रीचा हा गोंडस व्हिडीओ इन्स्टाग्रामवर संहारोरा नावाच्या युजरने शेअर केला आहे. हा व्हिडीओ ९ जुलैचा आहे, जो सध्या व्हायरल झाला आहे. सनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, दिल्लीत कडाक्याच्या असह्य उकाड्यात दिसलेली खरी मैत्री! हा व्हिडीओ लोकांना किती आवडला आहे, याचा अंदाज या व्हिडीओच्या व्ह्यूजच्या आकड्यावरून लावता येतो. आतापर्यंत ४ लाख ७७ हजार लोकांनी याला लाईक केलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर, लोक सतत त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत. काहींनी आपल्या मैत्रीच्या आठवणी शेअर केल्या आहेत.

एक यूजर म्हणतो, डिलिव्हरी बॉईज एकमेकांच्या वेदना समजून घेतात. आणखी एका यूजरने कमेंट करताना लिहिले आहे की, हा व्हिडीओ पाहून मला रडू येत आहे. दुसर्‍या युजरने कमेंट करत लिहिले, विलक्षण, हीच खरी माणूसकी.

Story img Loader