भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रेनचे अनेकांना आकर्षण असतं सध्या आपल्या देशात वंदे भारत एक्सप्रेस ही सेमी हायस्पीड दर्जाची स्वदेशी ट्रेन म्हणून ओळखली जाते. तिचा वेग ताशी १५० किलोमीटरपेक्षा जास्त असतो. त्यामुळे या ट्रेनमधून प्रवास करण्याचा अनेकांची इच्छा असते. सध्या अशाच एका व्यक्तीला वंदे भारत एक्सप्रेसचं आकर्षण असल्यामुळे तो ट्रेनमध्ये सेल्फी काढण्याासाठी चढला होता. मात्र, त्याला हा सेल्फी इतका महागात पडला आहे की पुन्हा तो या ट्रेनमध्ये सेल्फी काढण्याचं धाडस करणार नाही.

सध्या सोशल मीडियावर एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वंदे भारत एक्सप्रेसमध्ये सेल्फी काढण्याच्या नादात त्याला जवळपास १५० किलोमीटरचा प्रवास इच्छा नसताना करावा लागला आहे. या घटनेचा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना आपलं हसू आवरण कठीण झालं आहे. नुकतीच देशातील ८ वी वंदे भारत एक्सप्रेस सिकंदराबाद आणि विशाखापट्टणम दरम्यान सुरू करण्यात आली आहे.

cutest puppies following traffic rules
Viral Video : ही चाल तुरुतुरु…! रस्ता ओलांडणाऱ्या श्वानाच्या पिल्लांना पाहून नेटकरी पडले प्रेमात; म्हणाले, “फक्त अशी साथ…”
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Documentary, Solving Puzzles, Puzzles,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: कोडे सोडवण्याची गंमत…
indian railway viral video
ट्रेनमधून प्रवास करताना ‘ही’ एक चुक पडू शकते महागात, होऊ शकते मोठे आर्थिक नुकसान; पाहा धक्कादायक घटनेचा VIDEO 
Boyfriend surprises his blind girlfriend with a braille proposal video
याला म्हणतात खरं प्रेम! अंध गर्लफ्रेंडला बॉयफ्रेंडनं केलं अनोखं प्रपोज; VIDEO पाहून तरुणाचं कराल कौतुक
article about journey of author subodh kulkarni as a content writer
चौकट मोडताना : ‘कंटेन्ट रायटर’पर्यंतचा मुलाचा प्रवास
do you know advantage of pressing red button in pune
पीएमटी बसमधील या लाल बटणाचा काय उपयोग आहे? VIDEO होतोय व्हायरल

हेही वाचा- “आता वैताग आलाय…”, ‘सूर्यवंशम’ पाहून कंटाळलेल्या प्रेक्षकाने थेट TV चॅनेललाच लिहिलं पत्र

ही ट्रेन राजमुंदरी स्टेशनवर आली तेव्हा एक माणूस सेल्फी घेण्यासाठी ट्रेनमध्ये चढला. मात्र, तो सेल्फी घेत असतानाच या ट्रेनचा दरवाचा अचानक बंद झाला. त्यामुळे हा माणूस ट्रेनमध्येच अडकला. शिवाय ट्रेनने वेग धारण केल्यामुळे त्याला खाली उतरणं देखील अवघड झालं. आधीच ट्रेनमध्ये चुकून अडका आणि त्यात टीसीने या व्यक्तीला पकडलं, पण या व्यक्तीने या टीसीला त्याच्यासोबत घडलेला सर्व प्रकार त्याला सांगितला. त्यानंतर टीसीने या व्यक्तीला पुढे येणाऱ्या विजयवाडा स्टेशनवर उतरा असं सांगितलं. पण हे ऐकून या व्यक्तीला घाम फुटला कारण राजमुंदरी ते विजयवाडा हे अंतर तब्बल १५० किलोमीटर इतके आहे.

हेही पाहा- मालकिणीला घरकामात मदत करताना वानराची दमछाक, Viral Video पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

त्यामुळे या व्हिडीओतील या व्यक्तीला एका सेल्फीच्या नादात इच्छा नसतानाही जवळपास १५० किलोमीटरचा प्रवास ट्रेनमधून करावा लागला. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या व्यक्तीला मोठा दंडही करण्यात आला असता, परंतु वॉल्टेअर डीआरएम अनूप सत्पती यांनी सांगितले की, त्या व्यक्तीचे आधी समुपदेशन करण्यात आले आणि नंतर कोणताही दंड न आकारता त्याला सोडून देण्यात आले.