Viral Video: आजकालच्या शालेय शिक्षणात आणि पूर्वीच्या शालेय शिक्षणात जमीन-अस्मानाचा फरक पाहायला मिळतो. केवळ शिक्षणच नव्हे, तर शिक्षक आणि त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतींमध्येही मोठा फरक पाहायला मिळतो. पूर्वीचे शिक्षक एखादी गोष्ट समजावून सांगताना विद्यार्थ्यांना मारणे, शिक्षा देणे या पद्धतींचा अवलंब करायचे. परंतु, आताचे शिक्षक विद्यार्थ्यांच्या कलाने घेत, त्यांना नवनवीन गोष्टी शिकवतात. अर्थात, पूर्वीच्या शिक्षणात केवळ मुलांनी अभ्यास करून यश मिळवावं हाच हेतू असायचा. परंतु, बदलत्या काळानुसार आता शाळेत मुलांचे छंद, कला, आवड-निवड या सर्व गोष्टींकडेही लक्ष दिले जाते. त्यामुळे अनेकदा शिक्षकही वर्गातील विद्यार्थ्यांबरोबर नाचताना, गाणी गाताना दिसतात. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
हल्ली समाजमाध्यमांवर कधी कोणता व्हिडीओ तुफान व्हायरल होईल ते सांगता येत नाही. अनेकदा शाळा किंवा कॉलेजमधील शिक्षकांचे शाळेत शिकवितानाचे काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता शाळेतील असा एक व्हिडीओ सध्या खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात शिक्षिका चक्क विद्यार्थिनींबरोबर डान्स करताना दिसतेय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका शाळेमध्ये शिक्षिका आपल्या विद्यार्थिनींबरोबर ‘गुलाबी शरारा’ या पहाडी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यावेळी शिक्षिका करीत असलेला डान्स पाहून नेटकरीही अवाक् झाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होतोय.
पाहा व्हिडीओ
हा सोशल मीडियावर खूप चर्चेत असलेला व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @_whatsinthenews या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला अनेक व्ह्युज आणि लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक नेटकरी यावर विविध कमेंट्स करताना दिसत आहेत.
एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलंय, “आमच्या वेळी अशा मॅडम नव्हत्या.” दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “सुंदर डान्स करतायत.” तिसऱ्या युजरनं लिहिलंय, “कुठली शाळा आहे ही?”