Viral Video: सोशल मीडियावर वारंवार आपण नवनवीन व्हायरल व्हिडीओ पाहतो. त्यात कधी विविध रील्स, गाणी, डान्स असे युजर्सचे मनोरंजन करणारे व्हिडीओ असतात; तर कधी अपघाताचे, प्राण्यांच्या शिकारीचे, एखाद्या व्यक्तीचा मृत्यूचे व्हिडीओदेखील बऱ्याचदा सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. अशा व्हिडीओंमुळे आपला नेहमीच थरकाप उडतो. आतापर्यंत सोशल मीडियावर कधी जिममध्ये, तर कधी लिफ्टमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने अनेक व्यक्तींचा मृत्यू झाल्याचे आपण पाहिले आहे. आतादेखील असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा मृत्यूही निश्चित असतो. त्यामुळे कधी काळाचे सावट कोणावर झडप घालेल हे कोणीही सांगू शकत नाही. हल्ली हृदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हृदयविकाराच्या झटक्याने कधी भररस्त्यात, तर कधी लिफ्टमध्ये, जिममध्ये एक्सरसाइज करताना अनेकांचा मृत्यू होताना आपण पाहिले आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये असंच काहीतरी पाहायला मिळत आहे, जे पाहून अनेक जण अवाक् झाले आहेत.

नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये?

हा व्हायरल व्हिडीओ राजस्थान येथील जयपूरमधील असून येथील एका घरात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सर्वांसमोर नाचत असलेल्या ट्रान्सजेंडरबरोबर एक शिक्षकदेखील नाचण्यासाठी उभा राहतो. यावेळी नाचता नाचता अचानक तो शिक्षक जमिनीवर कोसळतो. सुरुवातीला बाजूला बसलेल्या लोकांच्या काही लक्षात येत नाही; पण नंतर त्या व्यक्तीची हालचाल पूर्णपणे बंद झाल्याचे कळते.

मिळालेल्या माहितीनुसार, नाचता नाचता जमिनीवर कोसळलेल्या शिक्षकाला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हा व्हिडीओ X(ट्विटर) @Telugu Scribe या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत ७० हजारांहून अधिक व्ह्युज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच त्यावर अनेक युजर्स अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा: “आई घरी वाट बघत असेल…” प्रसिद्धीसाठी तरुणाचा जीवघेणा स्टंट; VIDEO पाहून नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

या व्हिडीओखाली एका युजरनं लिहिलंय, “एक शंका या व्हिडीओंमध्ये जास्तीत जास्त पुरुष का आहेत?” दुसऱ्या व्यक्तीनं लिहिलंय, “प्रत्येकानं CPR द्यायला शिकले पाहिजे. ही काळाची गरज आहे.” तिसऱ्या व्यक्तीनं लिहिलंय, “सीपीआर केल्यास कदाचित संधी असेल तर…” आणखी एका व्यक्तीनं लिहिलंय, “काळजी घ्या. कधीही काहीही होऊ शकतं.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video teacher suffers heart attack while dancing with transgender at cultural event rajasthan sap