सध्या सगळीकडे लग्नाचा सीझन सुरू आहे. या सीझनमध्ये सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडीओ पहायला मिळत असतात. मुलीसाठी तिच्या लग्नाचा दिवस तिच्या आयुष्यातील सर्वात खास क्षणांपैकी एक असतो. या दिवशी तिच्या जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य, विशेषत: तिचे आई-वडील तिच्यासोबत असावेत असं वाटत असतं. पण या खास दिवशी जर आई वडीलांपैकी कोणी तिच्यासोबत नसेल तर तो क्षण नवरीसाठी खूप दुःखाचा असतो. असाच हा पाकिस्तानी वधूच्या तिच्या लग्नातील एन्ट्रीचा व्हिडीओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील. हा व्हिडीओ एकदा नक्की पाहाच.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक नववधू आपल्या वडिलांचा हात धरून स्टेजवर एन्ट्री करताना दिसत आहे. या व्हिडीओमधील नववधूने तिच्या आईला गमावलंय. एका हाताने वडिलांचा हात पडकत दुसऱ्या हातात तिने आपल्या दिवंगत आईचा फोटो धरला आहे. आईच्या आठवणीने डोळ्यातून अश्रु गाळत ही नववधू लग्नमंडपात एन्ट्री करताना पाहून साऱ्यांचंच मन पिघळून जात आहे. तिच्या एन्ट्रीचा हा व्हिडीओ पाहून कोणाचेही डोळे पाणावतील. यावेळी नववधूच्या वडिलांनाही आपल्या भावना आवरता आल्या नाहीत आणि ते सुद्दा भावूक झाले.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : एलियनसारखा दिसणारा मासा?, कपाळावर हिरवे डोळे आणि त्वचा काचेसारखी पारदर्शक! पाहून व्हाल हैराण

इस्लामाबादस्थित छायाचित्रकार महा वजाहत खान यांनी हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता आणि या व्हिडीओला आतापर्यंत १.२ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये नववधू तिच्या वडिलांसोबत हातात हात घालून एन्ट्री करताना बॅकग्राउंडमध्ये ‘चुनार’ या चित्रपटाचं गाणं ऐकू येत आहे. नववधू लाल रंगाच्या लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत होती. नवरदेवाकडे येत असताना तिच्या डोळ्यात अश्रू झिरपणं सुरूच होतं. कारण त्या क्षणी तिला आईची आठवण येत होती.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : ‘बुलेट राजा’चा वाजवला बाजा! बुलेटवर नवरी शोधत होता, कानपूर पोलिसांनी १४ हजारांचे चलान पाठवले

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : थाटामाटात निघाली होती शाही वरात, पण नवरदेवाची घोडागाडीच अचानक पेटली, पण थोडक्यात बचावला !

या व्हिडीओमध्ये नवरीचे नातेवाईक तिचं सांत्वन करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. तसंच तिच्या निरोपाची झलकही या व्हिडीओमध्ये पहायला मिळते. “त्या सर्व मुलींची नावे हा व्हिडीओ ज्यांची आई आज त्यांच्यासोबत नाही. माझ्यासारखं.. तुझी खूप आठवण येते अम्मी..’, अशी कॅप्शन लिहित हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओने नेटकऱ्यांना भावूक केलं आहे. युजर्स कमेंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज शेअर करत आहेत. एका यूजरने म्हटलं की, “तुमच्याही डोळ्यात अश्रू आले होते का, माझ्या डोळ्यात अश्रु आले होते.”

Story img Loader