Viral Video: शाळा म्हटलं की, आपल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक गोड हसू येतं, शाळेतले दिवस कधीही न विसरण्यासारखे असतात. शाळेत केलेला अभ्यास, मजा-मस्ती, भांडणं नेहमीच प्रत्येकाच्या आठवणींत घर करून राहतात. या जगात अशी एकही व्यक्ती नसेल, ज्याच्या शाळेशी जोडलेल्या काही आठवणी नसतील. शाळेतल्या गोड गमती-जमती आणि मित्र-मैत्रिणी, शिक्षकांनी शिकविलेल्या कविता, गोष्टी नेहमीच आपल्या स्मरणात असतात. परंतु, आता एका जिल्हा परिषदेच्या शाळेतील असा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

सोशल मीडियावर आपण अनेकदा शाळा किंवा कॉलेजमधील शिक्षकांचे शाळेत कविता शिकवितानाचे अनेक व्हिडीओ पाहिले आहेत. सोशल मीडियामुळे असे व्हिडीओ खूप चर्चेत येतात; परंतु आता जो व्हिडीओ व्हायरल होतोय, तो पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Shocking video of CRPF Jawan Catches Wife Trying To Elope, Thrashes Her Lover In Front Of Crowd At Patna Station
झालं का फिरुन? सीआरपीएफ जवानाने बायकोला बॉयफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं; VIDEO पाहून बसेल धक्का
Terrifying video shows skydiving instructor jumping off cliff before falling to death shocking video
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; स्कायडायव्हिंगवेळी प्रशिक्षकाचा तोल गेला, २० वर्षांचा अनुभव असतानाही नेमकं काय घडलं?
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
Shocking Video madhya pradesh woman jumped from moving train after fighting with her husband
Shocking Video: नवऱ्याशी भांडता भांडता महिलेनं ट्रेनमधून घेतली उडी; लेकरांचा भयंकर आक्रोश अन् थरारक प्रकार कॅमेरात कैद
Leopard's tactics for monkey hunting
युक्तीने साधला डाव! माकडाच्या शिकारीसाठी बिबट्याचा डावपेच; VIDEO पाहून अंगावर येईल काटा
Iranian university hijab protest
Iran Hijab Protest: हिजाब सक्तीच्या विरोधात विद्यार्थीनीचं निर्वस्त्र होत आंदोलन; व्हिडीओ व्हायरल होताच विद्यापीठानं केली कारवाई

हा व्हिडीओ एका गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शाळेतील एका वर्गातून दोन विद्यार्थिनी अचानक बाहेर येतात आणि शाळेच्या आवारात लोळतात. त्यानंतर त्या उठून चालण्याचा प्रयत्न करतात; पण पुन्हा जमिनीवर कोसळतात. या व्हिडीओमध्ये दिसत असलेली घटना खरी आहे की खोटी हे स्पष्ट झालं नसलं तरी हा व्हिडीओ पाहून नेटकरी पोट धरून हसत आहेत.

हेही वाचा: ‘डान्स असावा तर असा…’ ‘गनी बावरी’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक

पाहा व्हिडीओ:

या व्हिडीओवर आतापर्यंत पाच दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्सदेखील करीत आहेत.

या एका युजरनं लिहिलंय, “ही नाटकं आहेत.” दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “अशा गोष्टी सरकारी शाळेतच पाहायला मिळतील.” तिसऱ्या युजरनं लिहिलंय, “त्यांची परीक्षा असेल म्हणून त्यांच्या अंगात भूत आलं.” आणखी एका युजरनं लिहिलंय, “बाकीचे किती घाबरलेत यांना पाहून.”

Story img Loader