Viral Video: सोशल मीडियावर सतत विविध विषयांवरील व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यातील अनेक घटना काळजाचा थरकाप उडवणाऱ्या असतात. सध्या सोशल मीडियावर २०२० मधील एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय ज्यात एका चिमुकल्याच्या आजोबांची हत्या झाली असून तो मृतदेहावर बसून रडताना दिसत आहे.
२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मिर येथे झालेल्या पहलगाम हल्ल्याने संपूर्ण देश सुन्न झाला आहे. याचदरम्यान, २०२० मध्ये झालेल्या जम्मू-काश्मिर येथील दहशतवादी हल्ल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका चिमुकल्यासमोर त्याच्या आजोबांची हत्या केल्याचे पाहायला मिळत आहे.
काळीज पिळवटून टाकणारी घटना
२०२० मध्ये काश्मीरमधील सोपोरमध्ये एका चकमकीच्या ठिकाणी या चिमुकल्याचे ६० वर्षीय आजोबा अतिरेकी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत ठार झाले. अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला आणि सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले तेव्हा तो मुलगा आणि त्याचे आजोबा त्या परिसरातून जात होते. यावेळी चिमुकल्याच्या आजोबांना दोन गोळ्या लागल्या आणि ते जागीच मरण पावले. त्यानंतर तो चिमुकला रक्ताने माखलेल्या आजोबांच्या मृतदेहावर बसून रडू लागला. सोपोरमध्ये पोलिसांचा एक गट घटनास्थळी पोहोचताच त्यांनी मुलाला वाचवले आणि त्याला एका सुरक्षित ठिकाणी नेले. ही घटना नुकत्याच झालेल्या पहलगाम येथील हल्ल्याशी जोडली जात आहे. परंतु खालील पोस्टमध्ये या व्हायरल व्हिडीओतील सत्य सांगण्यात आले आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ X (ट्विटर) वरील @dintentdata या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून हा व्हिडीओचा २०२० मधील आहे.