Viral Video: एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करण्याच्या आरामदायक आणि जलद मार्ग म्हणजे विमान प्रवास. म्हणून आपल्यातील बरेच जण विमानाने प्रवास करणे पसंत करतात. विमानातून प्रवास करताना आपण गरजेच्या अनेक वस्तू घेऊन जातो. यामध्ये कपडे, मोबाईल चार्जर तर अनेक मौल्यवान वस्तूसुद्धा असतात; त्यामुळे या सामानाची काळजी घेणेसुद्धा तितकेच जबाबदारीचे काम असते. पण, आज व्हायरल व्हिडीओत एक धक्कादायक दृश्य पाहायला मिळालं आहे. विमानात सामान चढवणारे एअर इंडियाचे कर्मचारी गिटार वादकाचे वाद्य चुकीच्या पद्धतीने हाताळताना दिसले आहेत.

व्हायरल व्हिडीओ विमानतळावरील आहे. एअर इंडियाचे कर्मचारी प्रवाशाच्या सामानांना चुकीच्या पद्धतीने हाताळताना दिसत आहेत. विमानात सामान चढवणारे एअर इंडियाचे कर्मचारी यंत्रावरून येणारे सामान उचलून जोरात फेकून देतात. या सामानात एका व्यक्तीचे महागडे वाद्यसुद्धा असते. आपले महागडे वाद्य फेकताना पाहून व्यक्तीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्याचे ठरवले. एकदा पाहाच हा व्हिडीओ.

Cylinder explosion on a handcart in front of Shivajinagar court pune news
शिवाजीनगर न्यायालयासमोरील हातगाडीवर सिलिंडरचा स्फोट; तीनजण किरकोळ भाजून जखमी
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
50 to 60 school students hospitalised after lpg gas leak at jsw company in jaigad
जयगड येथील जेएसडब्ल्यू कंपनीमध्ये एलपीजी वायू गळती; नांदिवडे माध्यमिक विद्यालयाच्या ५० ते ६० विद्यार्थ्यांना त्रास
Case registered against two employees of Tinco company in air leak case Badlapur news
वायु गळती प्रकरणी गुन्हा दाखल; टिनको कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा
Kurla Bus Accident: Amid Probe, Viral Video Shows Another BEST Driver Buying Liquor From Wine Shop In Mumbai's Andheri shocking video viral
मुंबईत हे काय चाललंय? बेस्ट चालकाने बस थांबवली, वाईन शॉपवरुन दारु घेतली; कुर्ला अपघातानंतर दुसरा धक्कादायक VIDEO व्हायरल
Action taken against 20 dumpers for illegally dumping debris navi Mumbai news
नवी मुंबई: राडारोडा टाकणाऱ्या २० डंपरवर कारवाई
mobile transport officer stolen Mumbai, mobile stolen Mumbai,
मुंबई : वाहनावरील कारवाई टाळण्यासाठी परिवहन अधिकाऱ्याचा मोबाइलच पळवला
Kandalvan, drone filming, flamingos, Mumbai,
मुंबई : फ्लेमिंगोच्या ड्रोन चित्रिकरणाच्या प्रकरणाची कांदळवन कक्षाची चौकशी सुरू

हेही वाचा…धक्कादायक! चोरीचा आरोप, संतप्त चालकाने व्यक्तीला रिक्षाला बांधून नेले फरफटत; पाहा VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशाचे सामान ठेवण्यात निष्काळजीपणा दाखवताना दिसले आहेत. एअर इंडियाचे दोन कर्मचारी यंत्राद्वारे येणारे, बॅगेत ठेवलेले एका व्यक्तीचे गिटार वाद्य उचलून जोरात फेकून देतात. याबरोबरच यंत्राद्वारे येणारे इतर प्रवाशांचे सामानसुद्धा ते अशाच पद्धतीने उचलून फेकताना दिसतात.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @ishwar_dwivedi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने विमानात बसून या घटनेचे रेकॉर्डिंग केलं आहे. तसेच गिटार वादकाने हा व्हिडीओ रिपोस्ट करीत याबद्दल एअर इंडियाला टॅग करून त्यांना जाब विचारला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून प्रवाशांच्या सामानाची सुरक्षा आणि सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त करताना कमेंटमध्ये दिसत आहेत.

Story img Loader