Dahi Handi Viral Video: सोशल मीडियावर नेहमीच विविध विषयांवरील व्हिडीओ सातत्याने व्हायरल होत असतात. ज्यात कधी मजेशीर, तर कधी थरकाप उडवणारे व्हिडीओ व्हायरल झालेले आपण पाहतो. सध्या सोशल मीडियावर कृष्ण जन्माष्टमी आणि दहीदंडीच्या दिवशीचे अनेक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यात कधी शाळेतील विद्यार्थी राधा, कृष्ण यांच्या वेशात सुंदर नृत्य करताना दिसत आहेत; तर कधी तरुण मुलं दहीहंडीचा उत्सव साजरा करताना दिसत आहेत. दरम्यान, आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, जो पाहून नेटकरी कौतुक करताना दिसत आहेत.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी दहीहंडीचा उत्सव पार पडला. हा उत्सव महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. राज्यातील विविध ठिकाणी दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमांमध्ये अनेक गोविंदा पथकं सहभागी होतात आणि थरांवर थर रचून बक्षिसं जिंकतात. मुंबईतील दहीहंडीच्या कार्यक्रमांकडेही संपूर्ण राज्याचं लक्ष असतं. नुकत्याच व्हायरल होत असलेल्या लालबाग, परळ येथील व्हिडीओंनी अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामध्ये एक चिमुकला, असं काहीतरी करतोय, जे पाहून तुम्हीही त्याचं कौतुक कराल.
नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये?
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लालबाग, परळ येथील एका दहीहंडीच्या कार्यक्रमात आलेल्या एका गोविंदा पथकाने सलामी दिल्यानंतर सर्व गोविंदा खाली येतात आणि गाण्याच्या तालावर ठेका धरतात. त्यावेळी सर्वांत वर उभ्या असलेल्या चिमुकल्याला सुरक्षित दोरखंडाच्या मदतीनं खाली येता येता हवेतच गाण्यावर नाचायला सुरुवात करतो. यावेळी नाचत असलेल्या चिमुकल्याचा आत्मविश्वास आणि आनंद पाहून नेटकरी त्याचं खूप कौतुक करीत आहेत. “हा आनंदच वेगळा आहे…!”, असं लिहून हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @lalbaug_parel या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत आठ लाखांहून अधिक व्ह्युज आणि ८० हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
युजर्सच्या कमेंट्स चर्चेत
एका युजरनं लिहिलंय, “हा आनंद फक्त लालबाग, परळमध्ये अनुभवायला मिळतो…” दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “किती तो आनंद , किती छान वाटतं त्याला डान्स करताना बघून…. आपणहून चेहऱ्यावरती एक स्माईल आली आमच्या; पण.” तिसऱ्या युजरनं लिहिलंय, “तो खरंच भारी नाचत होता. मी समोरून पाहिलंय.” चौथ्या युजरनं लिहिलंय, “हा खरा उत्साह आहे आपल्या सणाचा…!!!”
© IE Online Media Services (P) Ltd