Viral Video: समाजमाध्यमांवर विविध विषयांवर आधारित व्हिडीओ नेहमीच चर्चेत असतात. त्यात बऱ्याचदा प्राण्यांचेदेखील अनेक व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. प्राण्यांच्या व्हिडीओंमध्ये कधी प्राण्यांचे हिंसक रूप आपल्याला पाहायला मिळते; तर कधी आपल्याला प्राण्यांच्या गमती-जमती दिसतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे; ज्यात एक गाय एका लहान बाळाबरोबर असं काहीतरी करताना दिसतेय, जे पाहून नेटकरीही अवाक् झाले आहेत.

भारतात गाईला आई माणून तिची पूजा केली जाते. त्यामुळे गाईला गोमातादेखील म्हटलं जातं. गाय फक्त तिच्या वासरांनाच नाही, तर माणसांनाही आईसारखा जीव लावताना दिसते. काही वर्षांपूर्वी असा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यात एक चिमुकला गाईच्या अवतीभोवती खेळताना दिसला होता. यावेळी गायदेखील त्या चिमुकल्याला स्वतःच्या बाळाप्रमाणे जीव लावताना दिसली होती. दरम्यान, आतादेखील असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय; ज्यात गाय एक लहान बाळाबरोबर असं काहीतरी करताना दिसतेय, जे पाहून युजर्सही त्या दोहोंचं कौतुक करताना दिसत आहेत.

Viral Video Shows lion gripping a mans limbs
‘हे तुमच्या कर्माचे फळ…’ पिंजऱ्यातील पाळीव सिंहाने माणसावर केला हल्ला अन्… VIRAL VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
attack by a wild dog on a deer
‘शेवटी मरण चुकवता येत नाही…’ हरणावर जंगली कुत्र्याचा क्रूर हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप
Dog Vs Chicken Fight See Who Will Win Animal Video Viral surprise after result dog scared from this bird watch viral video
“हरला तोच आहे, जो लढला नाही” कुत्रा करत होता कोंबड्याची शिकार पण १० सेकंदात पलटली बाजी; VIDEOचा शेवट पाहून व्हाल थक्क
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Shocking video Komodo Dragon Eat Goat In Just 5 Seconds Animal Video Viral
“या” महाकाय प्राण्यानं ५ सेकंदात गिळली जिवंत बकरी; पोटातून येतोय रडतानाचा आवाज, VIDEO पाहून काळजाचं पाणी होईल
three cheetahs attack the fox
‘तिघांच्या तावडीतून तो सटकला…’, तीन चित्त्यांचा कोल्ह्यावर हल्ला; थरारक VIDEO पाहून व्हाल शॉक
a student expressed about life after his father death
“अपघातात वडील वारले अन्…” चिमुकल्याने सांगितली व्यथा; विद्यार्थ्यांसह शिक्षकही रडले, पाहा VIRAL VIDEO

नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये?

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, गोठ्यामध्ये एका गाईसमोर एक कपडा टाकून, त्यावर एका चिमुकल्याला झोपवण्यात आलं आहे आणि ती गायही चिमुकल्याला स्वतःजवळ ओढून जिभेनं चाटताना दिसत आहे. गाईनं बाळाला स्वतःकडे ओढून घेतल्यानंतर बाळाची आई त्याला पुन्हा आपल्याकडे घेते. त्यावर गाय पुन्हा बाळाला स्वतःजवळ घेऊन चाटते. गाईचं हे प्रेम पाहून युजर्स या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @sunehrigaay या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत ७१ दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि एक दशलक्षाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा: ‘गावरान तडका…’ कधी गावच्या पारावर, तर कधी शाळेच्या आवारात मुलांनी केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

या व्हिडीओवर कमेंट करीत एका युजरनं लिहिलंय, “आतापर्यंत पाहिलेला सर्वांत सुंदर व्हिडीओ.” दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “छान बाळ आहे.” आणखी एकानं लिहिलंय, “हा व्हिडीओ कितीही छान असला तरीही बाळाची काळजी घ्यायला हवी.” आणखी एकानं लिहिलंय, “आईनं नीट लक्ष द्यायला हवं.”

Story img Loader