Ganpati Viral Video: सध्या संपूर्ण राज्यभरात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू असून कालच दीड दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. सोशल मीडियावरही बाप्पाचे लाखो फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यादरम्यान बाप्पाचे आगमन, दीड दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन, बाप्पाची सुंदर मूर्ती, डेकोरेशनचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. सध्या हैदराबादमधील एका सुंदर मूर्तीचा फोटो प्रचंड चर्चेत आला आहे, ज्यावर युजर्सही अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आतापर्यंत तुम्ही बाप्पाच्या मूर्तीला कधी श्रीकृष्णाच्या रुपात, कधी महादेवाच्या रुपात, तर कधी श्रीदत्तगुरूंच्या रुपात पाहिले असेल. पण, सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोतील बाप्पा प्रभू श्रीरामचंद्रांच्या रुपात पाहायला मिळत आहे. जानेवारी २०२४ मध्ये अयोध्येत तब्बल पाचशे वर्षांच्या प्रयत्नांनंतर प्रभू श्रीरामचंद्रांचे भव्य मंदिर बांधून त्यांच्या बालस्वरुप मूर्तीची स्थापन करण्यात आली होती. श्रीरामांचे हे बालरुप अनेकांना भावले. यंदा अनेक गणेश मंडळांमध्येही अयोध्येच्या थीमवर आधारित डेकोरेशन पाहायला मिळत आहे. अशातच या व्हिडीओतील बाप्पाची मूर्तीही अयोध्येतील मूर्तीप्रमाणे साकारण्यात आली आहे.

बाप्पाची सुंदर मूर्ती नेटकऱ्यांना भावली

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बाप्पाची श्रीरामांच्या रूपातील मूर्ती खूप सुंदर आणि लक्ष वेधून घेणारी आहे. या मूर्तीमध्ये बाप्पाला पिवळे पितांबर नेसवण्यात आले असून बाप्पाच्या अंगावरील दागिन्यांचेही सुंदर कोरीव काम करण्यात आले आहे. हा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहे.

हेही वाचा: आईशप्पथ! कुत्र्याला जीव लावणं पडलं महागात; अंगावर चढून केलं असं काही…, VIDEO पाहून अंगावर येईल काटा

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @vinay__kanna_official या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास लाखो व्ह्यूज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. त्याशिवाय अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत.

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “वा… खूप सुंदर मूर्ती”, आणखी एका युजरने लिहिलेय, “खूप आकर्षक मूर्ती”; आणखी एकाने लिहिलेय, “एक नंबर मूर्तिकार”, तर बाकी अनेक जण बाप्पाच्या मूर्तीचे कौतुक करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video the beautiful video of bappas idol same as ayodhya ram lalla murti sap