Viral Video: रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. वाहनचालकाच्या हलगर्जीपणामुळे किंवा रस्त्यावरून जाणाऱ्या एखाद्या व्यक्तीमुळे अनेकदा मोठमोठे अपघात होतात. त्यातील अनेक अपघातांमध्ये चूक नसूनही अनेक निष्पाप जीवांना आपला जीव गमावावा लागतो. त्यापैकी काही अपघातांचे व्हिडीओ हे सोशल मीडियावरदेखील व्हायरल होतात. अशाच अपघाताची एक दुर्घटना समोर आली आहे. हा व्हिडीओ पाहून नक्कीच तुमच्या काळजाचा ठोका चुकेल.

सोशल मीडियावर विविध विषयांवर आधारित व्हिडीओ सातत्याने व्हायरल होत असतात, त्यातील काही व्हिडीओ पाहून आपण खळखळून हसतो अन् आपले मनोरंजन होते; तर काही व्हिडीओ पाहून आपण घाबरतो, आपल्याला धडकी भरते. आता असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.

shirish more suicide letters
शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिल्या चार चिठ्ठ्या
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Congo
Congo Mass Murder : ‘काँगो’मध्ये बंडखोरांच्या हल्ल्यानंतर भीषण नरसंहार! तुरूंगातील शेकडो महिलांवर बलात्कार करून जिवंत जाळलं
Nurse Uses Fevikwik Instead Of Suturing Wound
Nurse Uses Fevikwik On Wound : सात वर्षीय मुलाच्या जखमेवर टाके घालण्याऐवजी नर्सने लावलं ‘फेविक्विक’, सरकारी रुग्णालयातील प्रकार; मग पुढे…
Jugad for home safety tips to protect house from thieves and fraud video goes viral
VIDEO: घरात चोरी होऊ नये म्हणून तरुणानं शोधला भन्नाट जुगाड; एकही रुपया खर्च न करता आधी हे काम करा, घरात कधीच चोरी होणार नाही
mom desi jugaad for her pet Dog
जगात भारी आईचा जुगाड! चहात बिस्कीट बुडवण्यासाठी ‘त्याचा’ हट्ट; आईने श्वानाला असं फसवलं; पाहा VIDEO
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
america president donald Trump Benjamin Netanyahu statement Gaza palestine unrest in Middle East
गाझावर आमचे राज्य… पॅलेस्टिनींनी जावे इतरत्र…! ट्रम्प यांच्या दाव्याने पुन्हा पश्चिम आशियात अस्थैर्य?

खरं तर मृत्यू कधी, कोणाला, कोणत्या ठिकाणी गाठेल हे सांगता येत नाही. अनेकदा काहींचा बसल्या जागी, तर कधी झोपेतही मृत्यू होतो. तर अनेक जण अनेक वर्षांपासून एखाद्या गंभीर आजाराने ग्रस्त असूनही ते दीर्घायुषी असतात. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका रस्त्यावरून एक बाईकस्वार जात असताना अचानक तो रस्त्यावर गाडीसकट खाली पडतो. यावेळी बाजूने एक ट्रक वेगाने येतो आणि त्या खाली पडलेल्या व्यक्तीच्या डोक्यावरून जाताना दिसतो. नक्की काय झालं असेल हे पाहायला अनेक जण गोळा होतात. परंतु, ती व्यक्ती उठून उभी राहते आणि हेल्मेट घालून पुन्हा गाडीवर बसून निघून जातो. ट्रक इतक्या जवळून जाऊनही ती व्यक्ती सुखरूप राहते. हा अविश्वसनीय व्हिडीओ पाहून अनेक जण अवाक् झाले आहेत.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @marathi_news0 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, त्यावर आतापर्यंत ४० हजारांहून अधिक व्ह्युज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “शेवटी देवाची कृपा आहे.” आणखी एकाने लिहिलेय, “अशा वेळी हेल्मेट घालायला हवे.”

Story img Loader