Viral Video: आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो, त्या व्यक्तीला लग्नासाठी प्रपोज करण्याकरिता काही जण कोणत्या तरी खास जागेची निवड करतात; जेणेकरून तो क्षण आणि ती जागा आयुष्यभर आठवणीत राहील. मग त्यासाठी अनेक जण बीच, हॉटेल, बोट अशापैकी एखाद्या ठिकाणाची निवड करतात. दरम्यान, आता असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे; ज्यामध्ये एका तरुण त्याच्या घरामध्ये कुटुंबीयांसमोर आपल्या प्रेयसीला लग्नाची मागणी घालत आहे. त्याशिवाय तो असं काहीतरी करतोय, जे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एखादं नवीन गाणं प्रदर्शित झालं की, सोशल मीडियावर ते खूप चर्चेत येतं. त्या गाण्यावर लोक अनेक रील्स, व्हिडीओ बनविले जातात. अगदी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत अनेकांना रील्स बनविल्याशिवाय राहवत नाही. काही दिवसांपासून गुलाबी साडी हे गाणं खूप चर्चेत आहे; ज्यावर अनेक जण रील्स बनवीत आहेत. आता एका प्रेमी तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होतोय; ज्यात तो त्याच्या प्रेयसीला गुलाबी साडी या गाण्यावर डान्स करीत प्रपोज करताना दिसत आहे.

नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये?

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण त्याच्या प्रेयसीला त्याच्या घरी घेऊन येतो आणि आपल्या कुटुंबीयांसमोर गुलाबी साडी गाण्यावर डान्स करीत तिला लग्नाची मागणी घालतो. यावेळी त्याच्या कुटुंबातील मंडळीदेखील व्हिडीओ, फोटो काढतात. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @assal_marathi_look_ या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत नऊ दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि दोन लाखांहून अधिक लाइक्सही आल्या आहेत. त्याशिवाय अनेकांनी हा व्हिडीओ शेअरदेखील केलेला आहे.

हेही वाचा: अरे बापरे! मांजर करतेय आत्महत्येचा प्रयत्न… Viral Video पाहून बसेल धक्का

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका नेटकऱ्यानं लिहिलंय की, जेव्हा ती ५० टक्के प्रॉपर्टी घेऊन जाईल तेव्हाही असाच नाच. तर दुसऱ्या युजरनं लिहिलंय की, भावा तू खूप नशीबवान आहेस. आजकाल अशा साध्या मुली पाहायला मिळत नाहीत. तिसऱ्या युजरनं लिहिलंय की, देवा, एक वेळ बिनलग्नाचा ठेव; पण इतका आत्मविश्वास नको देऊ रे बाबा. आणखी एकानं लिहिलंय की, किती नशीबवान आहे ती; जिला एवढी प्रेमळ माणसं भेटली आहेत.

दरम्यान, यापूर्वीही गुलाबी साडी या गाण्यावर अनेकांनी रील्स बनविल्या होत्या आणि त्या सोशल मीडियावरदेखील खूप व्हायरल झाल्या होत्या. त्यात एका महिलांच्या ग्रुपनंदेखील गुलाबी नऊवारी साडी नेसून, मराठमोळ्या पद्धतीनं डान्स केला होता. तसेच काही पुरुषांनी मॉर्निंग वॉकला गेल्यावर रील्स बनविल्या होत्या.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video the boyfriend proposed to the girlfriend while dancing to the gulabi saree song sap
Show comments