Accident Viral Video: रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. वाहनचालकाच्या हलगर्जीपणामुळे किंवा रस्त्यावरून जाणाऱ्या एखाद्या व्यक्तीमुळे अनेकदा मोठमोठे अपघात होतात. त्यातील अनेक अपघातांमध्ये चूक नसूनही निष्पाप जीवांना आपला जीव गमावावा लागतो. त्यापैकी काही अपघातांचे व्हिडीओ हे सोशल मीडियावरदेखील व्हायरल होतात. अशाच अपघाताची एक दुर्घटना समोर आली आहे. हा व्हिडीओ पाहून नक्कीच तुमच्या काळजाचा ठोका चुकेल.
सोशल मीडियावर विविध विषयांवर आधारित व्हिडीओ सातत्याने व्हायरल होत असतात, त्यातील काही व्हिडीओ पाहून आपले मनोरंजन होते, तर काही व्हिडीओ पाहून आपल्या काळजाचा ठोका चुकतो. आता असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुमचाही थरकाप उडेल.
मृत्यू कधी, कोणाला, कोणत्या ठिकाणी गाठेल हे सांगता येत नाही. अनेकदा काहींचा बसल्या जागी, तर कधी झोपेतही मृत्यू होतो. तर अनेक जण अनेक वर्षांपासून एखाद्या गंभीर आजाराने ग्रस्त असूनही ते दीर्घायुषी असतात. आता अशाच एका व्यक्तीचा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्ही शॉक व्हाल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका रस्त्यावरून मोठमोठ्या वाहनांची ये-जा सुरू असून यावेळी रस्त्याच्या कडेला एक व्यक्ती कंबरेवर हात ठेऊन स्वतःच्याच भानात कुठेतरी पाहत उभा राहिलेला दिसतो. यावेळी एक बस येते, परंतु, ती व्यक्ती रस्त्याच्या अगदी जवळ उभी असल्याने बसची धडक त्या व्यक्तीच्या चेहऱ्याला लागते आणि ती व्यक्ती जमिनीवर कोसळते. त्या व्यक्तीला खाली पडलेलं पाहून आसपासची लोकं गोळा होतात आणि त्या व्यक्तीला मदत करण्यासाठी तिथे पोहोचतात. हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत असून नेटकरी बसचालकाची बाजू घेताना दिसत आहेत, कारण यावेळी ती व्यक्ती भानावर नव्हती. तर काही जण त्या व्यक्तीची बाजू घेत आहेत. त्यांच्या मते, रस्त्यावर गाड्यांसाठी आखली जाणारी पांढरी रेष त्या व्यक्तीने क्रॉस केली नव्हती.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @kerala_bikes_trops या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. त्याला लाखो व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्सही यावर कमेंट्स करत आहेत. एक नेटकऱ्यानं लिहिलंय, “याला असंच पाहिजे”, तर दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “त्या माणसाची काही चूक नाही, तो नियमाप्रमाणेच उभा होता.” आणखी एकानं लिहिलंय, “कदाचित चालकाने मुद्दाम केलं.”