Viral Video: समाजमाध्यमांवर अनेक नवनवीन व्हिडीओ आपल्या नजरेस पडतात. त्यातील काही व्हिडीओ आपल्या विचारांच्याही पलीकडचे असतात. अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक जण आपली कला सादर करताना, तर अनेक जण ट्रेंडिंग असलेल्या गोष्टींवर मजेशीर रील्स बनविताना दिसतात. सोशल मीडियामुळे प्रत्येक दिवस काहीतरी नवीन घेऊन येताना दिसतो. त्यातच अनेकदा विविध जंगलांमधील व्हिडीओदेखील आपण पाहतो. त्यात प्राण्यांची शिकार, प्राण्यांची मैत्री अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मांजर अनेकांच्या घरात पाळली जाते. अनेक जण आवड म्हणून मांजर पाळतात, तर काही जण विशेषतः खेड्यातील घरांमध्ये उंदीर पकडण्यासाठी मांजर पाळतात. घरात एक जरी उंदीर दिसला की, मांजर लगेच त्याची शिकार करते. हे दृश्य तुम्ही कधी ना कधी तुमच्या डोळ्यांनी पाहिले असेलच. पण, आता व्हायरल व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक मांजर पक्ष्याची शिकार करताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका जंगलामध्ये मांजर उभी असून, अचानक तिला तिच्या डोक्यावरून उडत जाणाऱ्या पक्ष्याची चाहूल लागते. यावेळी ती सरळ पक्ष्यावर झडप घालण्यासाठी उंच उडी मारून, त्या पक्ष्याला आपल्या पंजांनी पकडण्याचा प्रयत्न करते. परंतु, यावेळी मांजरीचा तोल जातो आणि तिच्या पंजांतून तो पक्षी निसटतो. पक्ष्याच्या शिकारीसाठी मांजरीने केलेल्या या प्रयत्नाचे सोशल मीडियावर नेटकरी भरभरून कौतुक करताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ यूट्यूबवरील @Mr_Asmat या अकाउन्टवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर आतापर्यंत अनेक व्ह्यूज आणि लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करतानाही दिसत आहेत.

दरम्यान, यापूर्वीही अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामध्ये शिकार करणाऱ्या प्राण्याच्या हातून शिकार निसटताना दिसली आहे.