Viral Video: खरं प्रेम ही एक खूप सुंदर आणि निर्मळ भावना आहे. ज्या व्यक्तीवर आपले प्रेम असते, त्या व्यक्तीसाठी आपण काहीही करायला तयार असतो. पण, प्रेमात भांडणं, वादविवादही बऱ्याचदा पाहायला मिळतात. असं म्हणतात, जिथे जास्त प्रेम असतं तिथेच जास्त भांडणंदेखील होतात. मात्र, हल्ली भांडणातील निर्मळ आणि नि:स्वार्थी प्रेम फार क्वचित पाहायला मिळतं. कारण- अलीकडच्या नात्यांमध्ये भांडणं व्हायला लागली की, लोक लगेच ते नातं तोडून टाकण्याची घाई करतात, एकमेकांना मारहाण करतात, शिव्या देतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
हल्लीचा बदलणारा काळ बघता प्रेम, लग्नं फार काळ टिकत नाहीत. त्यामुळे ते दोघं एकमेकांना आयुष्यात कितपत साथ देतील हे सांगता येत नाही. पूर्वीच्या जोडप्यांमध्ये कधी भांडण झालं की ते अनेकदा तिसऱ्या व्यक्तीला कळायचंदेखील नाही. दोघांमधील भांडणं नेहमी घराच्या आता असायची. परंतु, हल्ली छोट्या छोट्या भांडणातही पती-पत्नी एकमेकांना मारहाण करतात, शिवीगाळ करतात. आता असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका रस्त्यावर पती-पत्नीमध्ये काहीतरी वाद सुरू असून, यावेळी ते दोघेही एकमेकांना मारहाण करायला सुरुवात करतात. यावेळी सुरुवातीला पती त्याच्या पत्नीला बेदम चोप देतो. त्यानंतर पत्नीदेखील पतीला मारहाण करायला सुरुवात करते. त्यांचं भांडण पाहून हळूहळू लोक गर्दी करतात. मग त्यावेळी दोघे बाईकवर बसून पसार होतात.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @prabhattt.06_ या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास नऊ लाखांहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाले आहेत. तसेच अनेक जण या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एकाने लिहिलेय, “या प्रेमाला काय नाव द्यायचं?” दुसऱ्या व्यक्तीने लिहिलेय, “आता राहिलेलं भांडण घरी जाऊन.” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “हे कसलं प्रेम?”