Viral Video: सोशल मीडियावर अनेक व्हायरल व्हिडीओ आपण दररोज पाहतो. ज्यातील बऱ्याच व्हिडीओंमुळे आपले मनोरंजन होते. पण, अनेकदा रील्सच्या नावाखाली अश्लील डान्सचे व्हिडीओ पाहायला मिळतात, जे पाहून युजर्स प्रचंड संताप व्यक्त करताना दिसतात. लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोणत्या थराला जातील हे सांगता येत नाही. पण, अनेकदा काही लोक त्यांच्या साधेपणामुळेदेखील लोकप्रिय होतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक कपल सुंदर डान्स करताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हल्ली कपल डान्स सर्रास सर्व कार्यक्रमांमध्ये पाहायला मिळतात. लग्न सोहळा असो किंवा इतर कुठलाही कार्यक्रम असो, लोक आपल्या जोडीदारासह आवर्जून ठेका धरतात. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक कपल साध्या, सुंदर पद्धतीने डान्स करताना दिसत आहे, जे पाहून युजर्सही कौतुक करताना दिसत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक कपल एका कार्यक्रमात सुंदर डान्स करत आहेत. यावेळी ते “तू मेरी है प्रेम की भाषा”, या गाण्यावर डान्स करत आहेत. पण, यावेळी त्यांच्या डान्समध्ये कोणताही अश्लील प्रकार दिसत नाही. त्यामुळे युजर्स या डान्सचे खूप कौतुक करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “याला म्हणतात मर्यादेत राहून एन्जॉय करणं.” परंतु, या व्हिडीओतील डान्स जरी सुंदर आणि मर्यादेत असला तरी डान्सच्या शेवटी काही लोकांनी कपल्सवर पैसे उडवले, जे पाहून अनेक जण नाराज झाले आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @ज़िन्दगी गुलज़ार है! या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत तीन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून यावर बारा हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा: ‘मुक्या प्राण्याच्या जीवाशी खेळ…’ व्हिडीओ बनवण्यासाठी तरुणीने श्वानाच्या पिल्लाला पुराच्या पाण्यात नेलं VIDEO पाहून युजर्स संतापले

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने लिहिलंय की, “छान डान्स आहे”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “डान्स वगैरे ठीक आहे, पण पैसे का उडवले?”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “डान्स छान होता पण पैसे नव्हते उडवायचे, मर्यादा भंग झाली” तर आणखी एका युजरने लिहिलंय की, “तुम्ही लक्ष्मीचा अपमान केला.”

दरम्यान, यापूर्वीदेखील डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते, ज्यातील तरुणी अश्लील पद्धतीने डान्स करताना दिसल्या होत्या. या व्हिडीओंवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता.