Viral Video: प्रत्येक शेतकरी त्याच्या गाय, बैल, म्हैस या पाळीव प्राण्यांनाही घरातील सदस्य समजून त्यांची काळजी घेतो. हे पाळीव प्राणी शेतकऱ्यासाठी खूप अनमोल असतात. हल्लीचे अनेक शेतकरी गोठ्यात प्राण्यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून अनेक आधुनिक सुविधा बसवतात. ज्यात पंखा, कॅमेरा, आधुनिक मशीन्सचा वापर केला जातो. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ गोठ्यात लावलेल्या कॅमेऱ्यात कैद झाला असून यामध्ये असं काहीतरी पाहायला मिळत आहे, जे पाहून तुमच्या काळजाचा थरकाप उडेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर विविध प्रकारचे नवनवीन व्हिडीओ व्हायरल झालेले आपण पाहतो, ज्यातील काही व्हिडीओंमुळे आपले मनोरंजन होते तर काही व्हिडीओंमुळे आपला थरकाप उडतो. असे व्हिडीओ सोशल मीडियावर क्षणार्धात लाखो व्ह्यूज मिळवतात. सध्या असाच एक काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून नेटकरी हळहळ व्यक्त करताना दिसत आहेत.

हा व्हायरल व्हिडीओ एका गोठ्यातील असून यावेळी गोठ्यामध्ये पाच गाईंना बांधलेले दिसत आहे. यावेळी या पाच गाईंच्या मध्यभागी असलेली एक पांढऱ्या रंगाची गाय खाली बसून चारा खात असताना अचानक त्या गाईच्या बाजूला उभी असलेली काळ्या रंगाची गाय तिच्या डोक्यावर बसते, ज्यामुळे पांढऱ्या गाईला उठता येत नाही. अनेक प्रयत्न करून ती गाय उठते, पण यावेळी तिच्या डोक्याच्या भागावर काळी गाय बसल्यामुळे तिला तिचं डोकं काढणं कठीण होतं. शेवटी पांढरी गाय जागीच जमिनीवर कोसळते. हा व्हिडीओ पाहून अनेक जण कमेंट्समध्ये गाईंना बसण्यासाठी या गोठ्यात व्यवस्थित जागा नसल्याचे म्हणताना दिसत आहेत.

हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील एका @shetkari.1_ या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत जवळपास अडीच लाखांहून अधिक व्ह्यूज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत.

हेही वाचा: “शेवटी कर्माचे फळ मिळतेच…” गेंड्याने ट्रकचालकावर केला हल्ला करण्याचा प्रयत्न; पण झालं असं काही… VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “याला असंच…”

पाहा व्हिडीओ:

तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यातील एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “सर्व शेतकरी मित्रांना पशुपालन करताना एक विनंती आहे, तुमच्याकडे चार गाई आसू द्या, पण त्यांना योग्य भरपूर जागा असावी”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “खूप दुःखद घटना”, तर तिसऱ्याने लिहिलंय की, “आपल्या जनावरांची काळजी घ्या.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video the cow in the manger took the life of another cow after watching the video users also shocked sap