Viral Video: आपण अनेकदा समाजमाध्यमांवर मजेशीर व्हिडीओ पाहतो. त्यातील प्राण्यांचे व्हिडीओ अनेकदा खूप मजेशीर असतात. पण, बऱ्याचदा काही व्हिडीओ असेही असतात; जे पाहून आपल्या काळजाचा ठोका चुकतो. सध्या असाच एक काळजाचा ठोका चुकविणारा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे; जो पाहून तुमचादेखील थरकाप उडेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बैल हा एक असा प्राणी आहे की, जो खवळला, तर कधीही काहीही करू शकतो. अशा वेळी त्याला नियंत्रणात ठेवणंदेखील खूप कठीण असतं. मागील काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशातील अशाच एका बैलाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता; ज्यामध्ये त्यानं अनेकांवर हल्ला केल्याचं दिसलं होत. या प्रकरणानंतर आतादेखील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. पण, हा व्हिडीओ भारतातील नसून अमेरिकेतील असल्याचं म्हटलं जात आहे.

हा व्हिडीओ अमेरिकेच्या सिस्टर्स रोडिओ मैदानाबाहेरचा आहे. त्यामध्ये अचानक बैल गोठ्याचे कुंपण ओलांडून बाहेर येतो आणि इकडे-तिकडे पळू लागतो. बैल पळून गेल्याचं पाहून तेथील कर्मचारी त्याला पकडण्यासाठी धावतात. मात्र, तोपर्यंत बैल गर्दीत उभ्या असलेल्या एका महिलेला उचलून फेकतो, यावेळी ती महिला गंभीर जखमी होते. तेथील इतर लोक दूर पळून जाण्याचा प्रयत्नदेखील करताना दिसत आहेत. बैल काही वेळ दहशत निर्माण करतो; पण नंतर लोकांनी त्याला पकडले. यावेळी आणखी एक व्यक्ती जखमी झाली. त्यानंतर त्याला पुन्हा गोठ्यात बांधून ठेवण्यात आले. मात्र, बैलामुळे जखमी झालेल्या दोघांनाही रुग्णालयात दाखल करून, त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

दरम्यान, सिस्टर्स रोडिओ कार्यक्रम अमेरिकेत खूप लोकप्रिय आहे. त्यात सहभागी होण्यासाठी आणि तो पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. रोडिओ हा एक अतिशय मनोरंजक खेळ मानला जात असला तरी अनेकदा त्यादरम्यान धोकादायक परिस्थिती येथे उदभवते.

हेही वाचा: पोरा तुझा नाद खुळा! ‘गुलाबी साडी’ अन् ‘पिरतीच्या झुल्यात…’ गाण्यावर चिमुकल्याचे जबरदस्त ठुमके VIDEO पाहून म्हणाल, ‘काय नाचतोय…’

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ X (ट्विटर) वरील @weixj8862 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याशिवाय या व्हिडीओला आतापर्यंत एक लाखाहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच त्यावर अनेक जण कमेंट्स करतानाही दिसत आहेत. एकानं लिहिलंय की, त्या महिलेनं लाल रंगाचे कपडे घातले होते म्हणून तिला बैलानं उडवलं. तर आणखी एकानं लिहिलंय, “माझा अंदाज आहे की, रोडिओला जाताना लाल रंग परिधान करून जाऊ नये. सगळ्यांच्या मागे धावत तिलाच त्यानं बाहेर काढले. कारण- तिनं लाल रंग घातला होता.” तर आणखी एकानं लिहिलंय, “ती तिथे का उभी आहे? म्हणून त्यानं मारलं.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video the crushed bull broke through the fence and entered the crowd and harm two people sap
Show comments