Viral Video: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ सतत व्हायरल होताना आपण पाहतो, अनेकदा प्राण्यांचे व्हिडीओदेखील यावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. ज्यात कधी काही हिंस्त्र प्राणी इतर प्राण्यांची शिकार करताना दिसतात, तर कधी प्राणी एकमेकांसोबत खेळताना दिसतात. असे व्हिडीओ सोशल मीडियावर क्षणार्धात लाखो व्ह्यूज मिळवतात. आता देखील अशाच एका गोंडस हत्तीच्या पिल्लाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो एका तो खेळताना दिसत आहे.
प्राणीदेखील माणसांप्रमाणेच विविध गोष्टींमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करत असतात. मागील काही महिन्यांपूर्वी असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यात एक हत्तीचे पिल्लू एकांतात एका तलावामध्ये पोहण्याचा आनंद घेत होते. तर काही दिवसांपूर्वीच व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका हत्तीचे पिल्लू आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्येदेखील असेच एक पिल्लू खेळताना दिसत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका हत्तीचे गोंडस पिल्लू मैदानात मोठ्या बॉलसोबत खेळताना दिसत आहे. यामध्ये कधी तो बॉलसोबत गोल गोल फिरत आहे तर कधी तो बॉल आपल्या पुढच्या दोन्ही पायांमध्ये पकडून ठेवत आहे. हत्तीच्या निरागस पिल्लाचा हा अनोखा खेळ पाहून युजर्सही त्याचं कौतुक करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप चर्चेत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @cutest.elephant या अकाउन्टवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर आतापर्यंत जवळपास तीन मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून हा व्हिडीओ तीन लाखांहून अधिक लोकांनी लाइक केला आहे. तसेच अनेक युजर्स यावर मजेशीर कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलंय की, “हा त्याच्या आयुष्यातील सुंदर क्षण जगत आहे”. तर दुसऱ्या व्यक्तीने लिहिलंय की, “हत्तीचे पिल्लू खूप क्यूट आहे”. तर तिसऱ्या व्यक्तीने लिहिलंय की, “छोटा हत्ती”, तर आणखी एका व्यक्तीने लिहिलंय की, “या हत्तीच्या पिल्लाची आई कुठे आहे?”