Viral Video: प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतःच्या लग्नाचा दिवस त्याच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि कधीही न विसरणारा दिवस असतो. तरुण वयात आल्यानंतर अनेक तरुण-तरुणी आपल्या लग्नाचे स्वप्न पाहतात. लग्नाच्या दिवशी लग्नातील सर्व प्रथा आवडीने पार पडतात. सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत, यादरम्यानचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. ज्यात कधी उखाणे, हार घालण्यावरून गमतीजमती; तर कधी वेगळ्या प्रथा पाहायला मिळतात. तसेच बऱ्याचदा नवऱ्याच्या एंट्रीचीदेखील खूप चर्चा होताना आपण पाहतो. दरम्यान, आता एका नवरदेवाचा अनोखा व्हिडीओ व्हायरल होतोय, पण यामध्ये तो कोणताही विधी नाही तर त्याचे कर्तव्य बजवताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

डॉक्टरांना नेहमीच लोक देवमाणूस म्हणतात, कारण ते नेहमी मृत्यूशी झुंज देणाऱ्या व्यक्तींचा जीव वाचवतात. डॉक्टरांच्या कामाचा आणि वेळेचा काहीही संबंध नसतो. बऱ्याचदा प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णासाठी ते अर्ध्या रात्रीदेखील उठून यायला तयार असतात. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्येदेखील असंच काहीतरी पाहायला मिळत आहे. पण, या व्हिडीओतील डॉक्टर अर्ध्या रात्री नाही तर चक्क स्वतःचं लग्न अर्धवट सोडून प्राण्याचा जीव वाचवण्यासाठी पोहोचल्याचं दिसत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका खेडेगावातील प्राण्यांचे डॉक्टर स्वतःचे लग्न अर्धवट सोडून एका आजारी गायीवर उपचार करण्यासाठी ते एका बाईकवरून पोहोचतात. यावेळी मुंडावळ्या आणि संपूर्ण नवरदेवाच्या वेशातच ते उपचार करतात. गायीवर उपचार केल्यानंतर ते पुन्हा आपल्या लग्नमंडपाकडे रवाना होतात. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @marathiveda या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत ८० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून यावर अनेक लाइक्सही मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा: ‘दिल संभल जा जरा…’ गाण्याचं आप्पांनी गायलं देसी व्हर्जन; ढोलकीची थाप अन् भन्नाट ताल; VIDEO पाहून धराल ठेका

पाहा व्हिडीओ:

या व्हिडीओवर कमेंटमध्ये एकाने लिहिलंय की, “खूप खूश राहा भावा”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “माणुसकी जपली राव…”, तर आणखी एका व्यक्तीने लिहिलंय की, “वेळ व काळ न बघता एकनिष्ठ सेवा, पशुवैद्यकीय सेवा”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “या डॉक्टरांना सलाम”, तर आणखी एकाने व्यक्तीने लिहिलंय की, “मन जिंकलस भावा.”