सोशल मीडियावर म्हणजे असंख्य व्हिडिओचा खजिनाच आहे. यावर आपल्याला एकापेक्षा एक भन्नाट व्हिडिओ पाहायला मिळतात. हे व्हिडिओ कधी आश्चर्याचा धक्का देणारे असतात तर कधी पोट धरुन हसायला लावतात. सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून लोक हसत आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये कुत्रा म्हशीवर स्वार होताना दिसत आहे. कुत्रा अगदी थाटात उभा असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.

वायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एखाद्या राजाप्रमाणे एक कुत्रा गावभर ऐटीत फिरत आहे. हा कुत्रा नुसता राजासारखा फिरत नाही तर तो म्हैस राइड करत आहे. राजेशाही रुबाबात म्हैशीच्या पाठीवर स्वार होऊन हा कुत्रा अगदी रुबाबात गावभर फिरत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीपासून आणि शेवटपर्यंत कुत्रा म्हशीवर उभा असल्याचे दिसत आहे. दोन म्हशी रस्त्यावरुन चालल्या आहेत आणि एका म्हशीच्या अंगावर कुत्रा उभा राहिला आहे. हा व्हिडिओ खूप जुना असून,अजूनही तो सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे. या व्हिडिओला नेटकऱ्यांची पसंती मिळत असून, नेटकऱ्यांना हसू आवरेनासे झाले आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचाकर्नाटकात भरधाव कारची धडक; १५ फूट उंच उडाली विद्यार्थिनी, अपघाताचा VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर हा व्हिडिओ लोकांच्या खूप पसंतीस उतरला आहे. या व्हिडिओवर लोक मजेशीर कमेंटही करत आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरता येणार नाही. एका युजरने म्हंटलंय “हर कुत्ते का दिन आता है ये सुना था आज देख भी लिया”

Story img Loader