Viral Video: समाजमाध्यमांवर सतत अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. त्यात अनेकदा प्राण्यांचे व्हिडीओदेखील यावर मोठ्या प्रमाणात चर्चेत असतात. या व्हिडीओंमध्ये कधी काही हिंस्त्र प्राणी इतर प्राण्यांची शिकार करताना दिसतात; तर कधी प्राणी एकमेकांसोबत खेळताना दिसतात. असे व्हिडीओ सोशल मीडियावर क्षणार्धात लाखो व्ह्युज मिळवतात. अशातच आता एका श्वानाचा व्हिडीओ खूप व्हायरल होतोय ज्यामध्ये तो गार्डनमध्ये आपल्या मालकाबरोबर फिरत असताना असं काहीतरी करतो जे पाहून युजर्सही त्याचे कौतुक करताना दिसत आहेत.

प्राणीदेखील माणसांप्रमाणेच विविध गोष्टींमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करत असतात. आपण जसे खेळतो, तसेच प्राणीदेखील एकमेकांसोबत खेळताना दिसतात. सोशल मीडियावर प्राण्यांचे असे गमतीशीर व्हिडीओ खूप व्हायरल होतात. मागील काही महिन्यांपूर्वी असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता; ज्यात एक हत्तीचे पिल्लू एकांतात एका तलावामध्ये पोहण्याचा आनंद घेत होते. तसेच एकदा एक मांजर चेंडूसोबत खेळताना दिसली होती. दरम्यान, आतादेखील असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय; ज्यात एक श्वान गार्डनमधील एअर वॉकर खेळताना दिसत आहे.

Shocking video of elder man kissing young woman on stage while dancing obscene video viral on social media
तरुणीला पाहून आजोबांचा सुटला ताबा, भरस्टेजवर डान्स सुरू असतानाच केलं किस अन्…, VIDEOमध्ये पाहा पुढे काय काय घडलं
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
Couples unique dance
”हृदयी वसंत फुलताना..” गाण्यावर काका काकूंचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून म्हणाल “आयुष्य खूप सुंदर फक्त नवरा हौशी पाहिजे”
A groom breaks down in tears as he watches his bride cry
नवरीला रडताना पाहून नवरदेवही रडला! VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “नशीबवान आहेस ताई तू…”
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर
Alia Bhatt Viral Video
तोंडाला मास्क, साधा लूक…; आलिशान गाडी सोडून आलिया भट्टचा रिक्षाने प्रवास; व्हिडीओ व्हायरल

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक श्वान गार्डनमध्ये व्यायाम करण्यासाठी ठेवलेल्या एअर वॉकरच्या तिथे येतो आणि एअर वॉकरच्या एका बाजूला सुरूवातीला पुढचे दोन पाय ठेवतो त्यानंतर श्वान त्यावर चारही पाय ठेवण्याचा प्रयत्न करतो. शेवटी श्वानाचा हा प्रयत्न यशस्वी होतो आणि तो आपले चारही पाय ठेवून एअर वॉकरवर उभा राहतो. यावेळी श्वानाच्या तोंडामध्ये एक काठीदेखील होती. एअर वॉकर झोक्याप्रमाणे फिरत असल्याने त्याला मजा येते. श्वानाचा हा क्षणिक आनंद अनेकांना खूप आवडला.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @sardarsayba या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत २८ मिलियनहून अधिक व्ह्युज आणि आठ लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करतानाही दिसत आहेत.

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “कोणीतरी त्याला झोका द्या” तर दुसऱ्या युजरने लिहिलेय, “त्याला ट्रेनिंगची गरज आहे” तर तिसऱ्या व्यक्तीने लिहिलेय, “किती खूश दिसतोय” तर आणखी एकाने लिहिलेय, “खूप सुंदर व्हिडीओ.”

हेही वाचा: “अरे बापरे, तो आला आणि तिला चक्क…” माकडाने महिलेबरोबर केलं असं काही… VIDEO पाहून नेटकरी झाले शॉक

पाहा व्हिडीओ:

दरम्यान, यापूर्वीदेखील काही श्वानांचे अनेक गमतीशीर व्हिडीओ खूप व्हायरल झाले होते; ज्यात एक श्वान त्याच्या मालकिणीला चकवा देऊन पावसात भिजण्यासाठी जातो. तर, आणखी एका व्हिडीओमध्ये एक श्वान चिकन पाहून डान्स करताना दिसला होता. तसेच आणखी एका व्हिडीओमध्ये एक श्वान चक्क कॅट वॉक करताना दिसला होता.

Story img Loader